शहरात विविध भागांत जिजाऊ क्लिनिकच्या प्रस्तावास राजेश पाटील यांची मंजुरी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी-चिंचवड, दि. ५ मे - स्थायी समिती, विधी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय प्रशासक राजेश पाटील यांच्या निर्णयार्थ आजच्या बैठकीत ठेवण्यात आले होते. या विषयांना प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली. प्रशासक राजेश पाटील यांच्या उपस्थितीत आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये बैठक संपन्न झाली. बैठकीस विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.
शहरातील दाट लोकवस्तीच्या भागामध्ये महापालिकेच्या वतीने जिजाऊ क्लिनिक सुरु करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी वायसीएम रुग्णालयासह हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पीटल आकुर्डी, जिजामाता रुग्णालय, थेरगाव रुग्णालय, भोसरी रुग्णालय असे अद्यावत सुसज्ज रुग्णालय सुरु आहे. शिवाय तालेरा रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय, सांगवी रुग्णालयासह २७ दवाखाने विविध भागांमध्ये कार्यरत आहेत. नागरिकांना पायाभूत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ज्या ठिकाणी १ किलोमीटर अंतरात महापालिकेचे रुग्णालय अथवा दवाखाने उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी जिजाऊ क्लिनिक सुरु करण्यात येणार आहे.
या ठिकाणी रुग्णांची तपासणी आणि आवश्यक औषधे उपलब्ध करुन दिले जाईल. पर्यायाने नागरिकांना प्राथमिक उपचार सुरु झाल्यामुळे महापालिका रुग्णालय अथवा दवाखान्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. या क्लिनिक मार्फत रुग्णसेवेबरोबर शासनामार्फत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत आरोग्य विषयक सेवा सहज पुरविणे शक्य होणार आहे. ८ हजार ते १० हजार वस्ती असलेला भाग, झोपडपट्टी भाग, जास्त मनुष्यवस्ती असलेल्या चाळी अथवा दाट लोकवस्तीच्या ठिकाणी जिजाऊ क्लिनिक सुरु करण्यात येणार आहे. या सेवेच्या अंमलबजावणीसाठी महापालिका सभेची मान्यता आवश्यक होती. प्रशासक राजेश पाटील यांनी बैठकीत या विषयाला मंजुरी दिली.