माझ्यासाठी हा दिवस खास म्हणत सोनाक्षी सिन्हा पोस्ट शेअर करत म्हणाली…

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

माझ्यासाठी हा दिवस खास म्हणत सोनाक्षी सिन्हा पोस्ट शेअर करत म्हणाली…

ध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहू लागले आहे. विकी-कतरिनापासून रणबीर-आलियापर्यंत गेल्या काही महिन्यात बी-टाउनमधील अनेक कपल्सनी लग्नगाठ बांधली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या  देखील लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा  देखील आता या रांगेत येऊन उभी राहिली आहे की काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. कारणही तसंच आहे.  सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.  फोटो शेअर केल्यानंतर आता सोनाक्षीचा साखरपुडा झाला का? असा प्रश्न नेटकरी करत आहेत. फोटोत सोनाक्षी तिची अंगठी दाखवत आहे. या फोटोमध्ये एक मिस्ट्री बॉय देखील आहे. ज्याच्या खांद्यावर हात ठेवून, हातात हात घेत काही फोटोज अभिनेत्रीने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावरील आनंद अजिबात लपत नाही आहे. दरम्यान या फोटोंमध्ये 'मिस्ट्री बॉय'चा चेहरा मात्र दिसत नाही आहे. फोटो शेअर करत “माझ्यासाठी हा दिवस खास आहे!!! माझ्या सर्वात मोठ्या स्वप्नांपैकी एक पूर्ण होत आहे… आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही…हे इतकं सोपं होतं यावर माझा विश्वास बसत नाही,” असे कॅप्शन सोनाक्षीने दिले आहे. दरम्यान आता अभिनेत्रीने रिंग फ्लाँट करताना फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे आता ती लवकरच लग्नबेडीत अडकणार का ?असा सवाल चाहत्यांना पडला आहे.

अभिनेत्रीचे नाव गेल्या काही वर्षांपासून झहीर इकबाल या तरुणाशी जोडले जाते. दोघे अनेक वर्षांपासून डेट करत असल्याच्याही चर्चा आहेत. झहीरच्या वाढदिवशी देखील अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर केली होती.
पण ते रिलेशनशिपमध्ये नाहीत याचा खुलासा जहीरने केला होता. त्यामुळे आता हा मिस्ट्री बॉय झहीर इकबाल आहे का याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.