प्रशासनाच्या काळात नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष – अण्णा बनसोडे
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी-चिंचवड, दि. २ मे - पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पालिकेशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत व आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी केली. आमदार बनसोडे यांनी प्रशासनाला सांगितले की, पिंपरी मतदारसंघात पालिका बहुतांश समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील विविध समस्यांबाबत आमदार बनसोडे यांनी आयुक्त राजेश पाटील यांची बैठक घेतली. बैठकीस संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
याबाबत बनसोडे म्हणाले की, मतदारसंघाच्या प्रश्नांसाठी आयुक्तांना अनेक निवेदने दिली आहेत. यावर समाधानकारक कार्यवाही झाली नाही. त्यामुळे बैठक घ्यावी लागली. निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक 26 येथील नियोजित कचरा केंद्राला विरोध करत अनिवासी जागेत दुसरी जागा शोधण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. स्वप्नपूर्तीत एमआयडीसी कॅम्पसमधील रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे. हेडगेवार भवनाच्या जागेवर व्यापारी संकुल, नवीन जलतरण तलाव आणि क्रीडा संकुल बांधण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करा. दलित वस्ती सुधार योजनेतून नवीन कामे हाती घेण्याचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवावेत.
चिंचवड पत्राशेड झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे वाटप रद्द करून मूळ झोपडपट्टीधारकांना घरे देण्याची प्रक्रिया सुरू करावी. भक्तीशक्ती ते मुकाई चौक या उड्डाणपुलाचे व रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे, अशा विविध मागण्या आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत करण्यात आल्या.