दिवसा ढवळ्या रस्त्याच्या कडेला झोपलेल्या माणसाला कारने चिरडले
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, दि. २८ एप्रिल - पुण्यामध्ये हिट अँड रनची एक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर कारचालकाने गाडी घातल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विशेष म्हणजे दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेकडे त्याठिकाणी असलेल्या नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचे व्हिडिओत दिसून आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यावसायिकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना पुण्यातील सॅलिसबरी पार्कमध्ये 20 एप्रिल रोजी घडली आहे. या घटनेच सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित हालचाल केली. मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात एका व्यावसायिकाविरूध्द चार दिवसांनी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. मात्र, त्यानंतर लगेच त्यांना जामिनावर सोडण्यात आले.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक कार फुटपाथच्या बाजूला झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरुन जात असल्याचे दिसत आहे. त्यावेळी गाडी पुढे घेताना अंदाज न आल्याने त्या व्यक्तीच्या अंगावरुन गाडी नेली. या घटनेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीच्या शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे पसार झालेल्या कार चालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली.
दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचे व्हिडिओत पहायला मिळत आहे. ये जा करणाऱ्या लोकांनीही केवळ बघ्याची भूमिका घेतली. मात्र, मृत व्यक्तीच्या शेजारी बसलेल्या कुत्र्याने त्या व्यक्तीच्या अंगावरुन कार गेल्यानंतर कारच्या दिशेने धाव घेतल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. माणसापेक्षा जनावरे अधिक सजग असतात हे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.