टँकर लॉबीच्या भल्यासाठी भाजपकडून शहरात कृत्रिम पाणीटंचाई – कविता आल्हाट
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी –
पवना धरणामध्ये मुबलक पाणी असतानाही केवळ भाजपधार्जिण्या टँकर लॉबीचे भले करण्यासाठी सत्ताधारी भाजपाचे नेते महापालिकेतील ठराविक अधिकाऱ्यांना हाताशी धरून शहरात कृत्रिम पाणीटंचाई करत असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा कविताताई आल्हाट यांनी केला.
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे यांच्या नेतृत्त्वाखाली शहरात संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक 13 मोरेवस्ती, ताम्हाणेवस्ती, म्हेत्रेवस्ती येथे स्वर्गिय दत्ताकाकाका साने प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी कविता आल्हाट बोलत होत्या. यावेळी शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष यश दत्ताकाका साने, नगरसेवक प्रविण भालेकर, समीर मासुळकर, नगरसेविका संगीता ताम्हाणे, विधानसभा अध्यक्षा मनीषा गटकळ यांच्यासह दत्तात्रय जगताप, बाळासाहेब मोरे, विनायक रणसुंभे, मेघा पळशीकर, प्रभागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना कविताताई आल्हाट म्हणाल्या, पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपाची सत्ता होती. या सत्ताकाळात गेल्या पाच वर्षांत पाण्यासाठी महिलांना मोठा त्रास सहन करावा लागला. 24 तास पाणी पुरवठ्याचे आश्वासन देणाऱ्या भाजप नेत्यांनी टँकर लॉबीचे हित जपण्यासाठी शहरात सध्या कृत्रिम पाणीटंचाई सुरू केली आहे. महापालिकेतील काही ठराविक अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार सुरू आहे. यातून अधिकारी, ठेकेदार आणि भाजपच्या भ्रष्ट नेत्यांची मिलिभगत असून सर्वसामान्य नागरिकांच्या कररुपातून जमा झालेल्या पैशांची लूट सुरू आहे.
भाजपाच्या नेत्यांकडून सुरू असलेल्या बेबंद कारभाराचा त्रास शहरातील महिला भगिनींना सहन करावा लागत आहे. रोजच्याच पाणीटंचाईमुळे महिलांचे हाल होत आहेत. मात्र स्वस्वार्थापोटी सर्वचकाही विसरलेल्या भाजप नेत्यांना त्याचे काहीच सोयरसुतक उरलेले नाही. त्यामुळे भाजपाच्या सत्ताकाळात शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा व तुटवडा सुरळीत करावयाचा असल्यास भाजपनेत्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आल्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आम्ही यशस्वी करून दाखवू, असा विश्वासही आल्हाट यांनी यावेळी बोलून दाखविला.