बेरोजगारी आणि महागाईची झळ सोसूनही जनतेनं भाजपला मतं दिली – डॉ. कोल्हे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

बेरोजगारी आणि महागाईची झळ सोसूनही जनतेनं भाजपला मतं दिली – डॉ. कोल्हे

पिंपरी-चिंचवड, दि. 11 मार्च – नुकत्याच झालेल्या 5 विधानसभा निवडणुकीत भाजपला चार राज्यांमध्ये विजय मिळाला. महागाई, बेरोजगारी, कोरोना काळातील प्रशासनाचा हलगर्जीपणा याकडे मतदारांनी कानाडोळा करून भाजपच्या पारड्यात मत टाकल्याचे दिसत आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पिंपरी-चिंचवडमधील शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

ते पुढे म्हणाले की, एकाच पक्षाला पुन्हा सत्ता मिळाल्याची घटना 37 वर्षांनंतर घडली आहे. स्वतः पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशची संपूर्ण प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. त्याचा परिणाम झाल्याचं दिसून येत असल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितले. विरोधकांनी बेरोजगारी, महागाई, कोरोना काळातील झालेली हेळसांड याकडे मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता पण या मुद्द्यांपेक्षा मतदारांनी भाजपवर विश्वास दाखवला.

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या 80 जागा वाढल्या असून शंभरीचा आकडा पार केला आहे. त्याबद्दल अखिलेश यादव यांचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे. त्यांनी भाजपला चांगलंच झुंजवल्याचं दिसून आलं आहे. या पुढे ते नक्कीच चांगली कामगिरी करतील असा विश्वास आहे.