भाजपची मुंबईत ताकद नाही म्हणून मनसेला सुपारी दिलीय – राऊत

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भाजपची मुंबईत ताकद नाही म्हणून मनसेला सुपारी दिलीय – राऊत

मुंबई, दि. १९ एप्रिल – मुंबईत भारतीय जनता पक्षाची ताकद नाही म्हणून दुसऱ्या एका पक्षाला सुपारी दिली असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मनसेचे नाव न घेता भाजपवर टीका केली आहे. मुंबईत तुमची ताकद नाही. त्यामुळं तुम्ही कोणालातरी पकडून हे काम दिलं आहे. तुम्ही भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. देशाची अर्थव्यवस्था आता कुठे मूळ पदावर येत आहे. पण पुन्हा राजकीय फायद्यासाठी दंगलींचे राजकारण करत असल्याची टीका राऊत यांनी केली. जर देशात अशाच प्रकारच्या घटना घडत राहिल्या तर आपली अर्थव्यवस्था श्रीलंका आणि युक्रेनपेक्षाही खाली जाईल, असेही राऊत म्हणाले.

देशात रामनवमी आणि हनुमान जयंतीला हिंसाचारासारख्या घटना घडल्या आहेत. भारतीय संस्कृतीला अशोभनीय अशा या घटना आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. या सगळ्याला प्रकाराला भाजप जबाबदार असून, या दंगली भाजपच्या सांगण्यानुसार घडल्या, असा आरोप राऊत यांनी केला.

देशाच्या दोन प्रमुख शहरांमध्ये अशा प्रकारच्या दंगली घडल्या आहेत. दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे. तिथे स्थानिक निवडणुका होणार आहेत. केवळ निवडणुका जिंकण्यासाठी अशा प्रकारच्या दंगली घडवल्या जातात. मुंबईतही तुम्ही असेच प्रकार सुरु केले आहेत. येत्या महानगर पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपाकडून अशा प्रकराची खेळी खेळण्यात येत आहे.

आम्ही एकजूट होत विधानसभा पोटनिवडणूक लढली आणि मोठ्या मताधिक्याने जिंकून आलो आहोत. याची विरोधकांमध्ये भीती आहे. आगामी काळात याच फॉर्मुल्यानुसार महाविकास आघाडी निवडणूक लढणार, अशी घोषणा राऊत यांनी केली.