गावठाण भागात राजकीय 'हळदी कुंकवा'चे कार्यक्रम जोमाने सुरू ; महिला मतदारांपर्यंत पोचण्यासाठी इच्छुकांचे नवे अस्त्र !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी -
प्रभाग रचना बदलल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यमान नागरसेवकांपासून नव्या इच्छुकांपर्यंत प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पोहोचणे म्हणजे मोठे आव्हान झाले आहे. संक्रांतीनंतर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांचा धडाका सुरू झाला असून विविध प्रकारच्या भेटवस्तूंची वाटप करून महिला मतदारांना आकर्षित करण्याची चढाओढ दिसून येत आहे. विशेषतः गावठाण भागात राजकीय हळदी-कुंकू जोमाने सुरू असल्याचे चित्र आहे.
मोशी, जाधववाडी- चिखली परिसरात सध्या हळदी कुंकवाचे कार्यक्रम जोरात सुरू आहेत. या कार्यक्रमांच्या माध्यमातून साड्यांसह विविध आकर्षक भेटवस्तू दिल्या जात असल्याने महिलांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण आहे. निवडणुकीला आणखी कालावधी असला तरी प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष भेटीवर इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकांनी जोर दिल्यामुळे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची जाहिरातबाजीही जोरात सुरू आहे. अनेक इच्छुकांनी प्रभागरचना अंतिम होण्यापूर्वीच कंबर कसली असून नागरिकांच्या मनापर्यंत व घरापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नासाठी कुटुंबातील मतदारसंख्या नावे व दूरध्वनी क्रमांकांची नोंदणीही या कार्यक्रमाच्या माध्यमातून चालविली जात आहे.
फलकांची चर्चा
सध्या विविध प्रभागात इच्छुकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून 'भावी नगरसेवक', 'समाजसेवक', 'विकासाचा चेहरा' यासारख्या अनेक बिरुदावल्या इच्छुकांच्या नावाच्या अगोदर लागू लागल्याने प्रभागात लावल्या जाणाऱ्या फलकांचीही चांगलीच चर्चा सुरू आहे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा महिलांसाठी आयोजित करून सण-उत्सवाची जपणूक करत असल्याचा आव आणला जात असला तरी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिलांच्या मतांचा जोगवा आपल्याच झोळीत पडावा यासाठीच ही धडपड असल्याचे दिसून येत आहे.
सन 2017 साली झालेली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चार सदस्यांची प्रभाग रचना होती. तर आता 2022 सालच्या महापालिका निवडणुकीसाठी 3 सदस्यांचा प्रभाग असणार आहे. त्यामुळे 2017 सालच्या प्रभाग रचनेत मोठा फेरबदल झाला आहे. गतवेळची प्रभागरचना ग्राह्य धरून ज्या इच्छुकांनी गेल्या वर्षभरापासून तयारी चालविली होती. त्यावर पूर्णत: पाणी फेरले गेल्याने नव इच्छुकांची मोठी धांदल उडाली आहे. तयारी केलेला बहुतांश भाग दसऱ्याच प्रभागाला जोडला गेल्याने वर्षभराची मेहनत आणि अर्थकारण वाया गेले आहे. त्यातच निवडणुकीला आता दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने एवढ्या कमी वेळेत सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेकांनी जोरदार तयारी चालविली आहे.