महापारेषणच्या 400 केव्ही टॉवर लाइनमध्ये बिघाडामुळे शहराचा वीजपुरवठा खंडित; कोट्यवधींचे नुकसान

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महापारेषणच्या 400 केव्ही टॉवर लाइनमध्ये बिघाडामुळे शहराचा वीजपुरवठा खंडित; कोट्यवधींचे नुकसान
पिंपरी -
पिंपरी-चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी परिसरात बुधवारी (दि.9) सकाळी सहापासून वीजपुरवठा खंडित झाला होता. महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही महत्त्वाच्या 400 केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाइनमध्ये बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास बिघाड (ट्रीपिंग) झाला. त्यामुळे  जवळपास सहा ते नऊ तास वीज पुरवठा खंडित झाला होता. 
सकाळपासूनच वीज नसल्यामुळे लघुउद्योगांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तसेच शाळा, रुग्णालये, बॅंका यांच्या दैनंदिन कामकाजावरही मोठा परिणाम झाला. अतिशय दाट धुके व दव यामुळे या टॉवर लाइनमध्ये बिघाड झाल्याची शक्‍यता असल्याचे महापारेषणकडून सांगण्यात आले. तसेच महत्वाचे दोन 400 केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्र बंद असल्याने पर्यायी वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नाही.
 
सेक्टर 7, 10 आणि कुदळवाडी परिसरात जवळपास नऊ तास वीज पुरवठा खंडित झाला होता. रावेत, थेरगाव, सांगवी, पिंपळे गुरव, चिंचवड, भोसरी एमआयडीसी, निगडी अशा शहराच्या विविध भागांमध्ये सकाळी सहापासून वीज पुरवठा खंडित झाला. टप्प्याटप्प्याने हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. चिंचवड परिसरात साडेतीन ते चार तासाने वीज पुरवठा सुरळीत झाला. पिंपरीतही जवळपास साडेचार तासाने वीज पुरवठा पुर्ववत सुरू झाला. थेरगाव, सांगवी, पिंपळे गुरव आदी परिसरामध्ये सकाळी सहा वाजता खंडित झालेला वीज पुरवठा दुपारी बाराच्या सुमारास काही काळासाठी सुरू झाला. त्यानंतर पुन्हा काही तासांसाठी वीज पुरवठा खंडित झाला होता.

तब्बल दोन हजार लघु उद्योगांना फटका 
शहरातील सुमारे दोन हजार लघुउद्योगांना खंडित वीज पुरवठ्यामुळे मोठा फटका बसला. ज्यांच्याकडे जनरेटरची व्यवस्था आहे त्यांनी पर्यायी व्यवस्था केली. मात्र, ज्यांच्याकडे या सुविधेचा अभाव आहे, त्यांची प्रचंड गैरसोय झाली. मोठ्या उद्योगांना आवश्‍यक कच्च्या मालाच्या उत्पादन प्रक्रियेत जवळपास सहा ते नऊ तासांचा खंड पडला. चाकण एमआयडीसीतील लघुउद्योगांनाही याचा मोठा फटका बसला.

बॅंका, शाळा, रुग्णालयांच्या कामकाजावर परिणाम
शहरातील विविध बॅंकांमध्ये आज संगणकावरील आवश्‍यक कामकाजासाठी जनरेटरचा वापर करण्यात आला. मात्र, बॅंकांतील अन्य वीज पुरवठा बंद होता. सध्या शहरामध्ये ऑफलाइन' व ऑनलाइन शाळा सुरू आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्याने शाळांनाही जनरेटरचा आधार घ्यावा लागला. रुग्णालयांमध्ये वीज पुरवठ्यावरच सर्व यंत्रणा चालते. शस्त्रक्रिया व अन्य यंत्रसामग्री चालू ठेवण्यासाठी रुग्णालयांनाही बराच वेळ जनरेटर चालवावे लागले.

जनजीवन विस्कळीत 
वीज पुरवठा खंडित झाल्याने त्याचा परिणाम जनजीवनावरही झाला होता. शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. घरातील टीव्ही, फ्रीज, फॅन, मोबाईल व लॅपटॉपचे चार्जिंग अशा सर्वच यंत्रणा बंद पडल्या होत्या.