पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कार्यकारिणीत होणार मोठे बदल ? शहराध्यक्ष पदासाठी अजित गव्हाणे तर महिला अध्यक्ष पदासाठी कविता आल्हाट यांची नावे जवळपास निश्चित !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यात होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. महापालिकेच्या दृष्टीकोनातून शहरातील विभागवार जबाबदारी देतानाच भोसरीतून अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांमध्ये समतोल राखण्यात आल्याचे सांगण्यात आले. शहराध्यक्षपदाचा मान भोसरी विधानसभेकडे देण्यात आला असून, अजित गव्हाणे यांचे नाव सर्वसंमतीने निश्चित करण्यात आल्याचे समोर आले आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या संघटना बांधणीमध्ये अग्रणी भूमिका घेतलेल्या कविता आल्हाट यांच्याकडे महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची बदलाबाबत सूचना
पदाधिकाऱ्यांची नावे अंतिम करून लवकरच ती जाहीर केली जाणार असल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. सध्या नियुक्त असलेले पदाधिकारी व नव्याने नियुक्त होणाऱ्या पदाधिकाऱ्यासमवेत उपमुख्यमंत्र्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत वरील नावे अंतिम करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
निवडणुकीच्या जबाबदारीचेही वाटप होणार
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने या निवडी करण्यात येणार असल्या तरी भाजपाला टक्कर देण्याच्या दृष्टीकोनातून निवडणुकीसाठी स्वतंत्र टीम तयार करून त्याचे कोणाकडे नेतृत्त्व दिले जाणार याकडे आता लक्ष लागले आहे. योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, आण्णा बनसोडे व विलास लांडे यांच्या नावांवर चर्चा सुरू असून, निवडणूक समिती प्रमुख, निवडणूक समन्वयक, प्रचार प्रमुख व मुख्य प्रवक्ता या पदांवर वरिष्ठ नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.