शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचे निधन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख  गजानन चिंचवडे यांचे निधन

पिंपरी -

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गजानन पोपट चिंचवडे यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 52 वर्षांचे होते. त्याच्या मागे पत्नी शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे आणि दोन मुले असा परिवार आहे.

शनिवारी (दि. 5) सकाळी अंघोळीसाठी ते बाथरुमध्ये गेले असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. गजानन चिंचवडे यांनी सुरूवातीला प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यासोबत कॉंग्रेसमधून राजकीय जीवनाला सुरुवात केली. पीसीएमटी सदस्य, महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. खासदार श्रीरंग बारणे यांचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेत चिंचवडगाव येथून निवडणूक लढविण्यासाठी त्यांची तयारी सुरू होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून ते प्रचंड तणावाखाली वावरत होते. त्यातच त्यांना आज हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चिंचवड परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.