शांततेत अडथळे आणणार्यांना सोडणार नाही- अमित शहा
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
श्रीनगर -जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 निष्प्रभ केल्यानंतर प्रथमच तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौर्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज शनिवारी दौर्याच्या पहिल्याच दिवशी दहशतवादावर कडाडून हल्ला चढवला. जम्मू-काश्मिरातील शांततेत अडथळे आणणार्यांना सोडणार नाही. त्यांचा कठोरपणे बिमोड केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी येथे युवकांना संबोधित करताना दिली.
जम्मू-काश्मिरात सुरू झालेल्या विकासात कुणीही अडथळा निर्माण करू शकणार नाही. यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 70 वर्षांत काय दिल, या कालावधीत विरोधकांनी 87 आमदार, 6 खासदार आणि तीन कुटुंबे दिली आहेत, असे टीकास्त्र विरोधकांवर सोडले. पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 हजार लोकनियुक्त प्रतिनिधी दिले असून, ते नागरिकांची सेवा करीत असल्याचे शाह यांनी सांगितले.
जम्मू-काश्मिरातील युवक आता विकास, रोजगार आणि अभ्यासाबाबत चर्चा करीत आहेत. हा एक मोठा बदल जम्मू-काश्मिरात घडला आहे. जम्मू-काश्मिरातील शांततेत अडथळे निर्माण करणार्यांचा कठोरपणे बिमोड केला जाईल. कुणी कितीही शक्ती पणाला लावली, तरी काश्मीरमध्ये सुरू असलेला हा सकारात्मक बदल रोखू शकणार नाही, अशी ग्वाही त्यांनी उपस्थित युवकांना दिली.
परिसीमनानंतर होणार निवडणूक
संसदेत दिलेले आश्वासन कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले जाईल. परिसीमनानंतर जम्मू-काश्मिरात निवडणूक घेतली जाईल आणि राज्याचा अधिकारही दिला जाईल, असे अमित शाह यांनी सांगितले.
तुमचे स्वप्न पूर्ण करू
तुम्ही मोठी स्वप्ने पाहा. तुमचे स्वप्न केंद्र सरकार पूर्ण करेल. मी कुण्या आमदार किंवा मु‘यमंत्र्याचा मुलगा नाही. भाजपात असलेल्या लोकशाहीमुळे मी तुमच्यासमोर उभा आहे. याच लोकशाहीच्या बळावर तुम्ही सरपंच आणि मु‘यमंत्रीही होऊ शकता, असे त्यांनी उपस्थितांना सांगितले.
विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी
जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी पंतप्रधान मोदी यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. केंद्र सरकार भविष्यातही निधी देत राहील. केंद्र सरकारने इतर राज्यांच्या तुलनेत जम्मू-काश्मीरमध्ये निधी दिला आहे. उद्योगांना प्रोत्साहन दिल्यास येथील रोजगाराच्या संधी वाढतील. सफरचंद आणि केशराच्या बागांनाही प्रोत्साहन मिळेल, असे अमित शाह यांनी सांगितले.