रुग्णाकडून एक लाख रुपये घेणाऱ्या 'स्पर्श'च्या तीन डॉक्टरांना पोलिसांकडून अटक
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्लस्टर येथील कोविड रुग्णालयात रुग्णास दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नसताना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकाकडून एक लाख रुपये घेतल्याप्रकरणी पोलिसांनी तीन डॉक्टरांना अटक केली आहे.पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्पर्श प्रा. लि.चे डॉ. प्रवीण जाधव, वाल्हेकवाडी येथील पदमजा हॉस्पिटलचे डॉ. शशांक राळे आणि डॉ. सचिन कसबे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप (वय 55, रा. चिंचवड) यांनी रविवारी (दि. 2) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 एप्रिल रोजी पहाटे सुरेखा अशोक वाबळे (रा. रामदास नगर, चिखलीगाव) यांना ऑटो क्लस्टर येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले होते. या रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नसताना आरोपींनी सुरेखा यांच्या नातेवाइकांकडून बेड मिळवून देण्याच्या उद्देशाने धमकावून ऍडमीट करण्यासाठी पैसे लागतात, असे सांगून एक लाख रुपये घेतले व त्यांची फसवणूक केली. सुरेखा यांच्या नातेवाईकांकडून आरोपी डॉ. प्रवीण जाधव याने एक लाख रुपये घेतले. त्यातील कट प्रॅक्टीस म्हणून वीस हजार रुपये पदमजा हॉस्पिटलच्या दोन्ही डॉक्टरांना दिले. उपचारादरम्यान सुरेखा यांचा मृत्यू झाला.
यानंतर हे प्रकरण भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड व विकास डोळस यांनी उघडकीस आणले होते. तर शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत यावरून बराच गदारोळ झाला होता. आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी करून कारवाई करावी, असा तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जावरून पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे. सहायक निरीक्षक महेश स्वामी याबाबत अधिक तपास करीत आहेत.