शहरात चोरीच्या चार घटना; पावणे चार लाखांचा ऐवज लंपास

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शहरात चोरीच्या चार घटना; पावणे चार लाखांचा ऐवज लंपास

  पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) पिंपरी चिंचवड शहर परिसरात चोरीच्या चार घटना घडल्या. तळेगाव एमआयडीसी, वाकड, भोसरी आणि चिखली परिसरात घडलेल्या या घटनांमध्ये पावणे चार लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. 29) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

मावळ तालुक्यातील नाणोली येथील फिरंगाई माता मंदिरातून देवीचे आठ हजार रुपये किमतीचे दागिने अज्ञातांनी चोरून नेले. हा प्रकार गुरुवारी (दि. 29) सायंकाळी पाच वाजता उघडकीस आला. याप्रकरणी दत्तात्रय नाथा मांजरे (वय 47, रा. नाणोली, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

थेरगाव येथील सिग्नेचर पार्क येथे पार्क केलेली 40 हजारांची दुचाकी (एमएच 10/डीएम 7410) अज्ञातांनी रात्रीच्या वेळी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 27) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सुरज सुभाष चौगुले (वय 34, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून आळेफाटा ते नाशिक फाटा कासारवाडी या मार्गावरून प्रवास करत असलेल्या एका महिलेच्या पिशवीतून एक लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठन चोरट्याने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत घडली. याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कुदळवाडी चिखली येथील स्वालीटेअर इंजिनिअर्स वर्कशॉप मधून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 16 हजार रुपये किमतीच्या 12 ट्रेची चोरी केली. ही घटना 20 जून रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी श्रीपाद विठ्ठल पाटील (वय 50, रा. वाकड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.