'दृश्यम २' हिंदीतही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !  

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

'दृश्यम २' हिंदीतही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !  

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - अभिनेता अजय देवगण अभिनित हिंदी चित्रपट ‘दृश्यम’ या चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी सुरू झाली आहे. हा चित्रपट मल्याळममध्ये प्रदर्शित झालेल्या याच नावाच्या चित्रपटाचा रिमेक होता. आता प्राइम व्हिडिओवर या मूळ मल्याळी चित्रपटाचा सिक्वेल 'दृश्यम 2' ची बरीच प्रशंसा होत आहे. अजय देवगण यांचे निकटवर्तीय असलेले निर्माता कुमार मंगत यांनीही 'दृश्यम 2' चित्रपटासाठी हिंदी रिमेक हक्क विकत घेतले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, निर्माता कुमार मंगत हिंदीमध्ये 'दृश्यम 2' चित्रपटाचा रीमेक बनवणार आहेत. हा चित्रपट नुकताच ओटीटीवर रिलीज झालेल्या 'दृश्यम 2' या मल्याळम चित्रपटाचा रीमेक असेल. मल्याळममध्ये बनविलेले दोन्ही चित्रपट जीतू जोसेफ दिग्दर्शित आहेत आणि दोन्ही चित्रपटांचे नायक मोहन लाल आहेत. गेल्या वर्षी 17 ऑगस्ट रोजी निधन झालेले निशिकांत कामत यांनी अजय देवगणच्या 'दृश्यम' चे दिग्दर्शन केले होते.

अजय देवगणने नुकतीच ‘रुद्र’ या डिस्ने प्लस हॉट स्टारच्या वेब सीरिजचा करार केला आहे.  'रुद्र' पूर्ण केल्यानंतर तो या वर्षाच्या शेवटी 'दृश्यम 2' च्या शूटिंगला सुरुवात करेल. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे. कुमार मंगत लवकरच चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या नावाची घोषणा करणार आहेत.

दिग्दर्शक जीतू जोसेफने मल्याळममध्ये 'दृश्यम 2' हिट झाल्यानंतर तेलगू रीमेकवर यापूर्वीच काम सुरु केले आहे. या आवृत्तीसाठी अभिनेता व्यंकटेशला साइन करण्यात आले आहे. चित्रपटाचा कन्नड रीमेक 'दृष्टी 2' च्या नावाने सुरू झाला असून त्याचे दिग्दर्शक पी. वासू असतील.

अजय देवगणच्या 'भुज द प्राइड ऑफ इंडिया' चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याखेरीज त्यांचे दोन चित्रपट 'मैदान' आणि 'मे डे' देखील वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातही त्यांची विशेष भूमिका आहे. अजय देवगणचे दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला चित्रपट 'चाणक्य' देखील बराच काळ प्रलंबित आहे.