लग्नसराईसाठी आताच करा सोने खरेदी .. भावात झाली 'इतकी' घसरण !

लग्नसराईसाठी आताच करा सोने खरेदी .. भावात झाली 'इतकी' घसरण !
नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज) - देशात लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. याबरोबरच सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये चढ-उतार दिसून येत आहेत.  मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) शनिवारी व्यवहार बंद असतात. त्यामुळे शुक्रवारी सोन्याच्या भावात घसरण होणं हा व्यवहार थांबला होता. चला तर, पाहुयात, शुक्रवारी सोन्या-चांदीच्या भावात किती घसरण झाली आहे. 
जून वायदा बाजार सोन्याचे भाव 212 रुपयांनी घसरून 47,560 रुपयांवर बंद झाला. तर मे चांदीचा वायदा बाजार 508 रुपयांनी घसरून 68,710 रुपयांवर बंद झाला.  चला पाहूया भारताच्या चार मोठ्या शहरांमध्ये सोन्या-चांदीची किंमत…
* दिल्लीत सोने आणि चांदीचा भाव
 22 कॅरेट सोन्याची किंमत - 46,350 / 10 ग्रॅम
 24 कॅरेट सोन्याची किंमत - 50,570 / 10 ग्रॅम
 चांदीची किंमत - 68,700 रुपये प्रति किलो
 
* मुंबईत मौल्यवान दागिन्यांची किंमत
 22 कॅरेट सोन्याची किंमत - 45,050 / 10 ग्रॅम
 24 कॅरेट सोन्याची किंमत - 46,050 / 10 ग्रॅम
 चांदीची किंमत - 68,700 रुपये प्रति किलो
 
* चेन्नईमध्ये सोने आणि चांदीची किंमत
 22 कॅरेट सोन्याची किंमत - 44,940 / 10 ग्रॅम
 24 कॅरेट सोन्याची किंमत - 49,030 / 10 ग्रॅम
 चांदीची किंमत - 68,700 रुपये प्रति किलो
 * कोलकाता मध्ये सोने आणि चांदीचा भाव
 22 कॅरेट सोन्याची किंमत - 47,540 / 10 ग्रॅम
 24 कॅरेट सोन्याची किंमत - 49,810 / 10 ग्रॅम
 चांदीची किंमत - 68,700 रुपये प्रति किलो
 
* सोन्याची शुद्धता कशी तपासायची, ते जाणून घ्या
आपण सोन्याची शुद्धता तपासून पाहू इच्छित असल्यास, सरकारने यासाठी एक ऍप  तयार केला आहे.  आपण 'बीआयएस केअर अ‍ॅप'द्वारे सोन्याचे शुद्धता तपासू शकता.  या अ‍ॅपद्वारे त्याच वेळी आपण सोन्याच्या शुद्धतेबद्दल तसेच त्यासंबंधित तक्रार करू शकता.  या अ‍ॅपद्वारे तक्रारीची माहिती ग्राहकांना त्वरित मिळेल.