जळगावातून दीड हजार किलो गांजा जप्त; एनसीबीची मोठी कारवाई  

जळगावातून दीड हजार किलो गांजा जप्त; एनसीबीची मोठी कारवाई  
मुंबई -
मुंबई एनसीबीच्या (NCB) पथकाने जळगावात एक मोठी कारवाई करत तब्बल दीड हजार किलो (1500) गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात एनसीबीच्या पथकाने दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ एनसीबीच्या पथकाने तब्बल दीड हजार किलो गांजा जप्त केला आहे. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आणला जात होता. महाराष्ट्रासह मुबंईत सध्या मोठ्या प्रमाणात एनसीबीकडून कारवाया केल्या जात आहेत. यादरम्यान, एनसीबीने अनेक ड्रग्ज पॅडलर्सच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर, बॉलिवूडशी संबंधित अनेकांवरही एनसीबीकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील ड्रग्ज पॅडलर्समध्ये धाकधूक वाढली आहे.

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरातील माजी नगरसेवक सय्यद मतीन यांच्या भावाची गाडी घेऊन जाणाऱ्या एका इसमाकडे नशेच्या 260 गोळ्या (बटण) आढळून आल्या होत्या. गुरुवारी (11 नोव्हेंबर) शहरातील सिटी चौक पोलिसांनी अण्णा भाऊ साठे चौकात रात्री साठेआठ वाजता ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी सय्यद मंजूर या आरोपीला अटक केली आहे.