आळंदीत पाणी पुरवठा विस्कळीत नागरिक हैराण ५० टक्के पाणी कर कपातीची मागणी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
आळंदी ( प्रबोधन न्यूज ) - पुणे महानगरपालिका व जलसंपदा विभाग यांचे मधील झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार भामा आसखेड धरणाची पाणी पातळी कमी झाल्याने पुण्याप्रमाणे आळंदीतही १८ मे पासून दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद रहात असल्याने तसेच पुण्यातील पाणी पुरवठा लाईन तांत्रिक देखभाल दुरुस्ती मुळे आळंदीतील पाणी पुरवठा गेल्या चार दिवसां पासून बंद होऊन विस्कळीत झाल्याने आळंदीकर नागरिक हैराण झाले आहेत.
भामा आसखेड धरणातून पुणेसह आळंदी ला होणार पाणी पुरवठा गेल्या १८ मे २०२३ पासून दर गुरुवारी होत नसल्याने आळंदी शहरात पाणी पुरवठा करण्यावर आळंदी नगरपरिषदेवर मर्यादा आली. यामुळे आळंदी शहरास दर गुरुवारी होणारा पाणी पुरवठा बंद रहात आहे. आळंदी खेड आणि आळंदी हवेली भागात ज्या ज्या ठिकाणी गुरुवारी पाणी पुरवठा होत आहे. त्या सर्व ठिकाणी पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक अगोदरच हैराण होते. यात भर म्हंणून पुण्यातील पाईप लाईन देखभाल दुरुस्ती आणि इतर कारणांमुळे आळंदीला पुण्याचे नियोजनावर अवलंबून रहावे लागत असल्याने गेल्या चार दिवसां पासून आळंदीतील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे ग्रामस्थ,महिला आणि वारकरी यांना देखील गैरसोयीस सामोरे जावे लागले आहे. संबंधित ठिकाणी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी प्राधान्याने पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यास देखील प्रशासनास अपयश आले. या बाबत नागरिकांना पूर्व कल्पना नसल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान पर्यायी पाण्याची व्यवस्था देखील न झाल्याने नागरिक, महिला हैराण झाल्या. पर्यायी व्यवस्थेत पाण्याचे टँकर ठिकठिकाणी सेवा सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकता होती. मात्र एक प्रकारे नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याची भावना व्यक्त केली गेली.
पुण्याचे स्कीम मधून आळंदीला पाणी पुरवठा होत असल्याने त्यांचे कडे कायम बिघाड, देखभाल दुरुस्ती ने येथील पाणी पुरवठ्यावर ताण येत आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करून देखील चार दिवस पाणी न आल्याने आळंदीत नाराजी वाढली.
पुण्यातील यंत्रणेत देखभाल दुरुस्ती मुळे आळंदीला पाणी पुरवठा होऊ शकला नाही. यामुळे आळंदीत पाणी उरवठा करता आला नाही. तेथील दुरुस्तीचे काम झाल्यानंतर तात्काळ पाणी पुरवठा सुरु केला जाईल. नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे, विभाग प्रमुख अक्षयकुमार शिरगिरे यांनी केले आहे.
सद्या आळंदीला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. येथील दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे ग्रहण कधी सुटणार असे नागरिक विचारात असून ऐन उन्हाळ्यात पाण्याची मागणी जास्त असताना एक दिवसाआड पाणी आणि अधिक तीन दिवस पाणी न आल्याने पाणी पुरवठा अधिक बंद झाला. यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त झाली. नागरिकांना गेले तीन दिवसी जारचे पाणी विकत घेण्याची वेळ आल्याने नाहक भुर्दंड सोसावा लागला.
आळंदीला रोज पाणी पुरवठा करण्याची मागणी आळंदीला भामा आसखेड ते आळंदी स्वतंत्र पाईप लाईन टाकून पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावून रोज पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष अजय तापकीर यांनी केली आहे. यापूर्वी ची योजना शॉट कट, कमी खर्चाचे नादात योजना मार्गी लावली गेल्यामुळे आळंदीकरांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. आता वेगवेगळ्या कारणांनी पाणी पुरवठा खंडित होवू लागला आहे. अगोदरच दिवसाआड पाणी त्यात गुरुवारी पाणी कपात आणि त्यात पुण्यातील कामाचे तांत्रिक अडचणीची भर पडली आहे. यामुळे आळंदीत पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. यापुढील काळात रोज पाणी पुरवठ्याचे नियोजन आळंदी नगरपरिषद प्रशासनाने करावे. अशी मागणी असून येत्या काळात यासाठी आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. आळंदी नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ दखल घेवून नियमित, सुरळीत आणि पुरेशा दाबाने, पुरेशा प्रमाणात सुरळीत पाणी पुरवठा नियोजन झोन निहाय तात्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. पाणी बचतीसाठी नळजोडला मिटर बसविण्याची व्यवस्था करावी. यामुळे पाणी बचत होवून पाणी पुरवठा उच्च दाबाने होण्यास मदत होईल. जोपर्यंत आळंदीला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. तो पर्यंत पाणी पट्टी ५० टक्केच घ्यावी असे अजय तापकीर यांनी सांगितले.