गतीमंद मुलीवर बलात्कार करून पुलावरून खाली फेकले ; राजस्थानातील घटनेने खळबळ
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
गतीमंद मुलीच्या प्रायव्हेट पार्टवरही गंभीर जखमा झाल्या असल्यानं तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या मुलीला पुढील उपचारासाठी जयपूरमधील रुग्णालयात नेलं जाण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारातही अनेक अडळले येत असल्याचं सांगितलं जातंय.
दरम्यान, ज्या गतीमंद मुलीवर बलात्कार करण्यात आला तिची ओळख देखील पटली आहे. ही मुलगी फक्त 'आई-बाबा' या पलिकडे काहीच बोलू शकत नाही. दरम्यान, आता या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसही सज्ज झाले आहेत. अलवरच्या पोलीस अधिक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी पाच पथकं तयार केली असून शोध मोहीमही सुरु आहे. मात्र अद्याप पोलिसांनी आरोपींचा कोणताही सुगावा लागू शकलेला नाही.
पीडित गतीमंद मुलगी ही संध्याकाळी पाच वाजल्यापासून बेपत्ता होती. तिच्या शोधासाठी आजूबाजूचा परिसरही नातलगांनी पालथा घातला होता. दरम्यान, या विदारक घटनेनंतर पुन्हा एकदा दिल्लीतील निर्भया बलात्कारप्रकरणाच्या कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.