गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढणार ?  पुणे पोलिसांकडून जळगावातून टेम्पोभर कागदपत्र जप्त

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढणार ?  पुणे पोलिसांकडून जळगावातून टेम्पोभर कागदपत्र जप्त

पुणे -

जळगावच्या मराठा विद्याप्रासारक संस्थेच्या वादाप्रकरणी पुणे पोलिसांनी जळगावातून टेम्पो भरून कागदपत्र जप्त केली आहेत. पुणे पोलिसांना या प्रकरणात मोठं लीड मिळण्याची शक्यता असल्यानं भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. 

जळगावला गिरीश महाजन यांच्यविरोधात नोंदवण्यात आलेल्या संबंधित गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या पथकाकडून एक टेम्पो भरून कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. पुणे पोलिसांनी कागदपत्र जप्त करत पुण्याला आणली आहेत. पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात जळगाव मराठा शिक्षण प्रसारक संस्थेसंदर्भातल्या वादातून महाजन आणि भोईटे यांच्या विरोधात अपहरणाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता.

गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढणार?
जळगाव मराठा शिक्षण प्रसारक संस्थेशी संबंधित कागदपत्र ही भोईटे आणि आणखी एक आरोपी तानाजी यांच्या घरी मिळून आली आहेत. जी कागदपत्रं संस्थेत असणं आवश्यक आहेत ती दुसरीकडं आढळल्यानं या कागदपत्रांतून मोठे लीड मिळण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण ?
जळगावच्या मराठा विद्याप्रासारक संस्थेशी निगडीत वादात दाखल गुन्ह्यावरून ही कारवाई करण्यात आली असल्याचे समजते. सुरुवातीला जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. नंतर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. अ‌ॅड. विजय पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.