जेलरच्या मुलाचा तरुणीसह पाच जणांनी केला खून; हडपसर येथील घटना
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
![जेलरच्या मुलाचा तरुणीसह पाच जणांनी केला खून; हडपसर येथील घटना](https://prabodhannews.com/uploads/images/2022/05/image_750x_628de7b4cc538.jpg)
पुणे, दि. 25 मे - अमरावतीच्या जिल्हा कारागृहात जेलर म्हणून काम करणाऱ्या उत्तरेश्वर गायकवाड यांच्या मुलाचा पुण्यातील ग्लायडिंग सेंटरमध्ये खून करण्यात आला आहे. उत्तरेश्वर गायकवाड यांचा मुलगा गिरीधर याचा हडपसर स्लायडिंग सेंटरमध्ये मध्यरात्री एका तरुणीसह पाच जणांनी खून करुन सासवड रोडच्या दिशेने पळून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. उत्तरेश्वर गायकवाड हे मूळचे उरळी कांचन येथील आहेत.
गिरीधर हा पुण्यातील एका नामांकित शाळेत महाविद्यालयीन शिक्षण घेत असून काल रात्री त्याला एकाने फोन करून बोलून घेतले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चार ते पाच जणांनी तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मंगळवारी संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आला. गिरीधर उत्तेश्वर गायकवाड (वय 21, रा. गोपाळपट्टी, पार्क साई टॉवर्स, मांजरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा खून एका तरुणीसह चार जणांनी केल्याचं समजतंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गिरीधर हा मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास घरी बसला होता. घरात गिरीधर, त्याचा भाऊ निखिलकुमार व आई उपस्थित होते. त्या वेळी एका मुलीचा फोन आला होता. फोनवर बोलून तो घराबाहेर निघाला त्या वेळी त्याच्या भावाने चौकशी केली असता त्याने सांगितले की, साक्षी पांचाळचा फोन होता. तिला मी भेटून परत अर्ध्या तासात येतो. असे सांगून तो घराबाहेर पडला. बराच वेळ झाला तरी गिरीधर परत न आल्याने निखिलकुमार काळजीत होता तोच त्याच्या वडिलांचा त्याला फोन आला व त्यांनी गिरीधरचा खून झाल्याची माहिती दिली. त्यानंतर निखिलकुमार व त्याची आई यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी गिरीधर हा रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. तेथे पोलीसही उपस्थित होते.
हडपसर पोलिसांनी गिरीधर याचा भाऊ निखिलकुमार या दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र हा खून कोणत्या कारणास्तव झाला याची माहिती मिळू शकली नाही.