लक्ष्मणचा खून खंडणीसाठीच; पोलिसांनी केले स्पष्ट

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

लक्ष्मणचा खून खंडणीसाठीच; पोलिसांनी केले स्पष्ट

पिंपरी-चिंचवड, दि. २० – येथील चिखली परिसरातील हसगुडे वस्तीमध्ये तीन दिवसांपूर्वी आठ वर्षीय मुलाच्या झालेल्या खुनाबद्दल पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी खुलासा केला आहे. आरोपींनी अगोदर मुलाचे अपहरण केले, नंतर खंडणी मागण्याचा विचार होता, परंतु योजना फसत असल्याचे पाहून मुलाची निर्घृण हत्या केली.

पिंपरी-चिंचवड शहराचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले की, १६ एप्रिल रोजी हरगुडे वस्ती येथील राहणारे बाबूराम डुंगराम देवासी यांचा आठ वर्षांचा मुलगा लक्ष्मण देवासी यास दुपारी १२.३० वाजता गायब झाला होता. घरच्यांनी तशी तक्रारही पोलिसांत दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी लक्ष्मणचा शोध सुरू केला. पोलिसांनी ७ संशयित लोकांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करत असतानाच गुंडा विरोधी पथकाने मुख्य आरोपी बपील अहमद रईस लष्कर (वय २६, राहणार गणेश मंदिर जवळ, हरगुडे वस्ती, कुदळवाडी, चिखली, पुणे, मूळ निवासी काझीडहर, नरसिंगपूर, आसाम) यास अटक करण्यात यश मिळविले. आरोपीने गुन्हा कबूल केला आहे.

आरोपीने खुनाचे कारण स्पष्ट केले आहे. आरोपी हा एक सीएनजी मशीन ऑपरेटर आहे. व्हिसा, पासपोर्ट काढण्यासाठी त्यास १ लाख रुपयांची गरज होती. आरोपी आणि पिडीत परिवार गेल्या तीन वर्षांपासून शेजारी राहत आहेत. त्यांची एकमेकांशी चांगली ओळख आहे. आरोपीने लक्ष्मणला लालूच दाखवून घरापासून गाडीवरून दूर नेले. ही घटना आसपासच्या परिसरात चित्रित झाली आहे. जाताना वाटेत अपघात झाला व लक्ष्मण गाडीवरून पडला आणि त्याला मार लागून जखमी झाला तसेच जखमेतून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे लक्ष्मण जोरजोराने रडू लागला. या घटनेमुळे आरोपी घाबरला व त्याने लक्ष्मणला अपघात स्थळापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या एका पडक्या पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन गेला. आता आपले बिंग फोटणार या भीतीने आरोपीने लक्ष्मणच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टूने वार करून त्याला ठार मारले.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पोलीस वेगवेगळ्या अँगलने गुन्ह्याचा तपास करीत आहेत. पोलिसांना पहिल्याच दिवसापासून आरोपी लष्करवर संशय होता. पोलिसांनी परिसरातील ८३ सीसीटीव्ही फुटेज गोळा करून तपास केला.

या गुन्ह्याचा तपास अप्पर पुलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, डीसीपी परिमंडल 2 आनंद भोईटे, एसीपी डॉ. प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) पदमाकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक डॉ. अशोक डोंगरे, सहायक पोलीस निरिक्षक हरिश माने, हजरत पठाण, प्रविण तापकीर, सोपान ठोकल, गंगाराम चव्हाण, विक्रम जगदाळे, गणेश मेदगे, सुनिल चौधरी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, मयूर दळवी, रामदास मोहिते, ज्ञानेश्वर गिरी व तौफीक शेख यांनी तपास केला.