भारतीय भगिनींची दानत ! तालिबान्यांच्या तावडीतून पाच कुत्रे, एक मांजर आणि 92 अफगाण नागरीकांना सोडवण्यासाठी दीड कोटी दिले !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भारतीय भगिनींची दानत ! तालिबान्यांच्या तावडीतून पाच कुत्रे, एक मांजर आणि 92 अफगाण नागरीकांना सोडवण्यासाठी दीड कोटी दिले !
नवी दिल्ली - 

तालिबानच्या जोखडातून सुटका करण्यासाठी दोन सख्ख्या भारतीय बहिणींनी जवळपास दीड कोटी रुपये खर्च केले. त्यातली एक बहिणी ही दिल्लीत रहाते तर दुसरी बहिण ही जिब्राल्टरला. दोघींनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ दीड कोटी रुपये खर्च करुन पाच कुत्री, एक मांजर आणि 92 अफगाण महिला मुलांची ताबिलान्यांच्या तावडीतून सुटका केलीय. हे सर्व जण सध्या पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आहेत. तिथून ते आता नेमके कोणत्या देशात सेटल होणार याची चाचपणी सुरु आहे. पण सर्व जण सुरक्षित आहेत कारण त्यांचा तालिबान्यांपासून बचाव करणारी टीम ही इस्त्रायल आणि अमेरीकन आहे. हे सर्व जण तिसऱ्या देशात म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तान सोडून सेटल होणार आहेत.

हे मिशन होतं ऑपरेशन मॅझिक कार्पेट नावाचं. सहा पाळीव प्राणी, 30 महिला, 32 लहान मुलं यांचा वाचवण्यात आलंय. ह्या सर्वांना अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आणलं गेलं. तेही हवाई किंवा समुद्रमार्गे नाही तर डोंगर-दऱ्या पार करत जमीन मार्गाने. यात काही व्हेटरनरी डॉक्टर्स आहेत, काही एक्झिक्युटीव्ह आहेत तर काही माजी सुरक्षा अधिकाऱ्यांची कुटूंब आहेत. वेळोवेळी त्यांना सुरक्षित घरात ठेवण्यात आलं आणि मजल दर मजल करत त्यांना काबूल ते इस्लामबाद असं ट्रॉन्सपोर्ट केलं गेलंय. ह्यात एक 90 वर्षांची एक महिलाही आहे आणि याच मिशन दरम्यान जन्मलेलं एक बाळही आहे. ह्या सर्व मोहीमेला जवळपास 3 कोटी रुपये खर्च आला. आणि त्यातला निम्मा खर्च हा दोन भारतीय बहिणींनी केलाय. कारण त्यांची आई पाकिस्तानमधून फाळणीच्या वेळेस भारतात आली होती आणि स्थलांतराची वेदना, जुलमी राजवटी याचा अनुभव त्या कुटुंबाला होता. आईकडून ह्या दोन्ही बहिणींनी हे खुप वेळा ऐकलं होतं. त्याच वेदनेतून त्यांनी दीड कोटी रुपये ह्या अफगाण लोकांसाठी खर्च केले.

ज्यांना वाचवण्यात आलंय ते सर्व जण पाकिस्तानात आहेत. तिथून ते युरोप, अमेरीका, इस्त्रायल अशा कुठल्या तरी तिसऱ्या देशात सेटल होण्याची प्रकिया त्यांची सुरु आहे. त्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पार पाडण्यात येतेय. वेगवेगळ्या देशांकडे त्यासाठी विचारणा केली जातेय. यातले 30 जण हे मुक्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या मेहीव ऍनिमल चॅरीटीशी संबंधीत आहेत. ह्या ट्रस्टच्या पॅट्रॉन ह्या मेघन मर्केल आहेत. त्या ब्रिटीश रॉयल फॅमिलीशी संबंधीत आहेत. त्यामुळे तिसऱ्या देशात जागा मिळणे सोपे जाईल, अशी शक्यता आहे.