'तुम्ही शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे ?' ; लोकसभेतील अडखळण्यावरून टीकेनंतर नारायण राणेंची संजय राऊतांना विचारणा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

'तुम्ही शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे ?' ; लोकसभेतील अडखळण्यावरून टीकेनंतर नारायण राणेंची संजय राऊतांना विचारणा
मुंबई -
डीएमके नेत्या कनिमोळी यांनी लोकसभेत भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोरोना परिस्थितीत उद्योग क्षेत्र आणि त्यांचे चालक यासंबंधी प्रश्न इंग्रजीतून विचारला होता. मात्र प्रश्नाचं उत्तर देताना राणे अडखळले. यावरून शिवसेनेने त्यांना लक्ष्य केल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत  यांच्यावर नारायण राणे यांनी टीका केली. ते शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दिल्लीत ते राष्ट्रवादीच्याच कार्यालयात असतात. त्यांना शिवसेनेविषयी कोणतीही निष्ठा नाही, प्रामाणिक नाही. ते कधी होते शिवसेनेत, काय केलं पक्षासाठी, असा सवाल त्यांनी केलाय. ते बोलतात तसे नाहीत. एका खासदाराला, वृत्तपत्राच्या संपादकाला अशाप्रकारची भाषा शोभत नाही, असा हल्लाबोल त्यांनी केलाय. 

कोरोनासह विविध मुद्द्यांवर केंद्र सरकार चांगलं काम करतंय. ओमिक्रॉन या नव्या कोरोनाच्या विषाणूसंदर्भातही विविध प्रभावी उपाययोजना केंद्राकडून केल्या जात आहेत. देश आत्मनिर्भरतेच्या दिशेने चाललाय. अधिवेशन सुरळीत सुरू आहे, शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलंय, असे ते म्हणाले. हे सरकार मोदींचं सरकार आहे, ते पुढचे २५ वर्ष हलतं नाही, असं वक्तव्य भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलंय. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरही टीकास्त्र सोडलं. आपल्या खात्याचा विस्तार वाढावा, अधिकाधिक रोजगार निर्मिती खात्याच्या माध्यमातून व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.