साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२३ निमित्ताने रंगले कविसंमेलन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२३ निमित्ताने रंगले  कविसंमेलन

     पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -  न्याय, समता, बंधुता, विडंबन, हास्य, राजकीय विद्रोह, देशभक्ती, सामाजिक व सद्य स्थितीवर आधारित बहारदार कविता सादर करून कवींनी कविसंमेलनामध्ये रंगत आणली. निगडी येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२३ निमित्ताने काल कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी ॲड. महेंद्रकुमार गायकवाड, अनिल नाटेकर, गणेश पुंडे, संजय साळुंखे, महेंद्र पाटोळे, अरूण कांबळे, अमरजीत गायकवाड, प्रतिमा काळे, वर्षा बालगोपाल, दिनेश भोसले, फुलवती जगताप, मधुश्री ओव्हाळ, किशोर केदारी, दत्तु ठोकळे, सुनिता भिसे, शाम सरकाळे, सिद्धार्थ भोसले, राजू जाधव, विशाल कसबे, अण्णा कसबे, प्रदीप गांधलीकर, विजय कांबळे, नागनाथ लोंढे, विलासरूप टक्के, सौम्या सोनवणे, देवेंद्र गावंडे, ॲड. उमाकांत आदमाने, रुपाली अवचरे, आशा शहाणे, नलिनी सोनवणे, योगिता कवठेकर आदी. कवींनी आपल्या कविता सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

कविसंमेलन सुरूवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांच्या टाळ्यांनी बहरून गेले होते. संमेलनामध्ये न्याय, समता, बंधुता, विडंबन, विद्रोह, हास्य, सामाजिक, देशभक्तीपर कवितांचा समावेश होता ही या कविसंमेलनाची वैशिष्ट्ये होती. 

या कविसंमेलनाचे अध्यक्ष ॲड. महेंद्रकुमार यांनी सोन्याचा पिवळा चुटूक धूर ही कविता सादर करून प्राचीन भारत देशाची महिमा उजागर केली. ज्येष्ठ गझलकार आणि कवी दिनेश भोसले यांनी उत्खनन ही कविता सादर केली. ज्येष्ठ निवेदक आणि कवी किशोरी केदारी यांनी न्याय-समता-बंधुता ही कविता सादर करून प्रेक्षकांमध्ये नवचेतना निर्माण केली. मधुश्री ओव्हाळ यांनी महान देशाची अशी कहाणी ही कविता तर अमरजीत गायकवाड यांनी मानाचा मुजरा ही कविता सादर केली. सुनिल भिसे यांनी बाबा काय गुन्हा केला ही कविता तर महेंद्र पाटोळे यांनी संयुक्त चळवळ ही कविता सादर केली. फुलवती जगताप यांनी दीड दिवसाची शाळा ही तर संजय साळुंखे यांनी लोकशाहीचे वस्त्रहरण ही कविता सादर केली. अरुण कांबळे यांनी मुंबई तर सिद्धार्थ भोसले मतांचे राजकारण ही कविता सादर केली. अण्णासाहेब कसबे यांनी दुखणे अज्ञानाचे ही कविता सादर केली तर प्रदिप गांधलीकर यांनी साहित्य सम्राट ही कविता सादर केली. यानंतर विशाल कसबे यांनी व्यवस्था ही कविता सादर केली आणि वर्षा बालगोपाल यांनी मानवता धर्म ही कविता सादर केली,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांचे हस्ते कविसंमेलनाचे अध्यक्ष ॲड.महेंद्रकुमार गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

कविता संमेलनाचे प्रास्ताविक सुनिल भिसे यांनी केले तर सुत्रसंचालन अमरजीत गायकवाड यांनी केले तर किशोर केदारी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.