लातुरात आईने दोन वर्षांच्या मुलाची विहिरीत फेकून केली हत्या

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

लातुरात आईने दोन वर्षांच्या मुलाची विहिरीत फेकून केली हत्या

लातूर -

लातूर जिल्ह्यात जन्मदात्या आईने आपल्या दोन वर्षांच्या चिमुरड्याला विहिरीत फेकून जीवे मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या वैरीण मातेला पोलिसांनी अटक केली असून तिने खुनाची कबुली दिल्याची माहिती आहे. मात्र तिची मानसिक अवस्था बरी नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 
आपल्या पत्नीनेच मुलाची हत्या केल्याचा आरोप पिता वेंकट पांचाळ याने केला आहे. माया पांचाळ असे आरोपी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी मायाला बेड्या ठोकल्या असून तिने लेकाची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती आहे.

मुलाचा पिता वेंकट पांचाळ एका खासगी कंपनीत नोकरी करतो. तो काही कामानिमित्त बाहेर गेला होता. परत आल्यावर मुलगा घरी कुठेच न दिसल्यामुळे त्याने बायकोकडे चौकशी केली. तेव्हा तिने मुलाला विहिरीत फेकल्याचं सांगितलं. बायकोचं उत्तर ऐकून त्याचा पायाखालची जमीनच सरकली. त्याने तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी महिलेची मानसिक स्थिती बरी नसल्याचं प्रथमदर्शनी सांगितलं आहे. मुलाच्या हत्येनंतरही काही काळ ती विहिरीजवळच बसून होती. कुटुंबातील सदस्यांनी सांगितल्यानुसार ती आणि पती वेंकट यांच्यात अनेक वेळा लहान मोठ्या कारणांवरुन वाद विवाद व्हायचे. दाम्पत्यातील सततची भांडणं हेसुद्धा मुलाच्या हत्येमागील एक कारण असू शकतं, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

माया आणि वेंकट यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती. त्यांना दोन वर्षांचा एकुलता एक मुलगा होता. हत्येच्या घटनेच्या आठ दिवस आधी माया आणि वेकट या दोघा पती-पत्नींमध्ये आपापसात मारामारी झाल्याचंही सांगितलं जातं. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.