सुधीर जगताप चिंचवडमधून अर्ज भरणार : तानसेन ननावरे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सुधीर जगताप चिंचवडमधून अर्ज भरणार : तानसेन ननावरे

पिंपरी -  चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीत युनायटेड रिपब्लिकन पार्टी उमेदवार उभा करणार असून पक्षाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुधीर लक्ष्मण जगताप हे मंगळवारी आपला अर्ज दाखल करतील अशी माहिती युनायटेड रिपब्लिकन पार्टी पक्षनेते तानसेन ननावरे यांनी दिली.

पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी सुधीर लक्ष्मण जगताप, जीवन भालेराव, तुषार जगताप, शाम वाडकर, पार्वती जगताप, संगीता जगताप, संगीता पवार, नीलम म्हस्के, छाया कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी तानसेन ननावरे यांनी सांगितले की, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत आमच्या पक्षाच्यावतीने पारंपरिक

मक्तेदारी मोडून काढण्यासाठी, वंचित घटकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे सुधीर जगताप ही निवडणूक लढणार आहेत. जर सर्व सहमतीने ही निवडणूक बिनविरोध घेण्याचे ठरले तर सुधीर जगताप हे आपली उमेदवारी माघार घेतील. जातीयवादाला मुठमाती देण्यासाठी, दलित वंचित मागासवर्गीय समुहांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सुधीर जगताप यांची उमेदवारी आहे. या निवडणुकीत पुणे जिल्हयातील वतनी जमिनदारांचे प्रश्न, वतनी जमिनीचे प्रचंड प्रमाणात झालेले हस्तांतर, गोरगरीब अशिक्षित वतनी जमीनदारांच्या गरिबी व अज्ञानाचा गैरफायदा घेवून दाखविली गेलेली खरेदी व गहाणवट द्वारे शेकडो एकर जमिनी जातीयवादी सत्ताधारी श्रीमंत शेतकऱ्यांनी हडप केलेल्या आहेत. त्याला जिल्ह्यातील राजकारणाची साथ आहे.

या सर्व प्रकरणात महसूल खात्यातील भ्रष्ट व जातीयवादींची बेमालूम साथ आहे. उताऱ्यांवर विविध नोंदी करणे, बोगस वारसदारांचे नाव नोंदवणे, क्षेत्रफळांचा मेळ जमत नाही असे शेरे मारुन वतनदार जमिनदाराची गळचेपी केली जात आहे. त्याचप्रमाणे आदिवासी जमातीच्या जमिनीची खरेदी विक्रीस बंदी असलेला कायदा अंमलात आणावा, या धर्तीवर महार वतन जमिनीच्या खरेदी विक्रीस पायबंद घालणारा कायदा अंमलात आणावा व अशा प्रकारे हस्तांतरीत झालेल्या वतन जमिनीचे हस्तांतर रद्द करुन त्या पूर्वलक्षी प्रभावाने वतनदाराच्या वारसांच्या हवाली करण्यात याव्यात हे प्रश्न घेवून युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे सुधीर जगताप चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार आहेत असेही तानसेन ननावरे यांनी सांगितले.