पंकजा मुंडे, मुनगंटीवार मैदानात , भाजपकडून ७२ उमेदवारांची दुसरी यादी, राज्यातील २० जणांचा समावेश
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली , (प्रबोधन न्यूज) - सत्ताधारी भाजपकडून लोकसभा निवडणुकीची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. याआधी पक्षाने १ मार्च रोजी १९५ जणांची पहिली यादी जाहीर केली होती, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहसह अनेक प्रमुख स्टार उमेदवारांचा समावेश होता. आता दुस-या यादीत पक्षाने ७२ उमेदवारांची घोषणा केली आहे. दुस-या यादीत राज्यातील २० उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये पंकजा मुंडे, स्मिता वाघ, मुरलीधर मोहोळ, सुधीर मुनगंटीवार, पियुष गोयल, अनुप धोत्रे या नव्या चेह-यांना संधी देण्यात आली.
भाजपने आज दुसरी यादी जारी केली. यात ७२ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये २० उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. भाजपने राज्यात दिग्गजांची नावे जाहीर केली. मात्र, अनेक दिग्गजांची नावे कापली. यामध्ये प्रामुख्याने भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापण्यात आले. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली.
यासोबतच बीडमधून पंकजा मुंडे यांना तिकीट दिल्याने त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापले गेले. दुसरीकडे उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघात आमदार मिहीर कोटेचा यांना तिकीट देऊन भाजपने मनोज कोटक यांना धक्का दिला. जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना वगळून स्मिता वाघ यांना तिकीट दिले. अकोल्यात खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी मुलगा अनुप धोत्रे यांना तिकीट दिले. पुण्यात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना, तर चंद्रपूरमधून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरविले आहे.
भाजपने पहिल्या यादीत ३४ केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी दिली होती. पहिल्या यादीत २८ महिला, ४७ युवकांचा समावेश होता. राज्यवार विचार केल्यास उत्तर प्रदेशमधील ५१, पश्चिम बंगालमधील २०, मध्य प्रदेशमधील २४, गुजरात आणि राजस्थानमधील प्रत्येकी १५, केरळ आणि तेलंगणामधील प्रत्येकी १२, झारखंड, छत्तीसगड आणि आसाममधील प्रत्येकी ११, दिल्लीतील ५ तर अन्य काही केंद्र शासित प्रदेशातील उमेदवारांचा समावेश होता.
महाराष्ट्रातील उमेदवार
नागपूर- नितीन गडकरी
पुणे- मुरलीधर मोहोळ
माढा- रणजीतसिंह निंबाळकर
जळगाव- स्मिता वाघ
रावेर – रक्षा खडसे
धुळे – डॉ. सुभाष भामरे
वर्धा – रामदास तडस
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार
दिंडोरी – भारती पवार
भिवंडी – कपिल पाटील
सांगली – संजयकाका पाटील
नगर- सुजय विखे-पाटील
जालना- रावसाहेब दानवे
नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर
अकोला- अनुप धोत्रे
उत्तर मुंबई- पियुष गोयल
उत्तर पूर्व मुंबई : मिहीर कोटेचा
बीड- पंकजा मुंडे
लातूर-सुधाकर शृंगारे
नंदुरबार- हिना गावीत