काळेवाडीतून व्यापाऱ्याचे १४ लाख लुटणाऱ्या आरोपींच्या वाकड पोलिसांनी आवळल्या मुसक्या

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

काळेवाडीतून व्यापाऱ्याचे १४ लाख लुटणाऱ्या आरोपींच्या वाकड पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  - कापड दुकानदार १४ लाखांची रोकड घरी घेऊन जात असताना दोघांनी लुटल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कापड दुकानदार मोहनदास तेजवानी हे त्यांच्या दुकानातील रोख रक्कम १४ लाख रुपये दुचाकीवरून घरी घेऊन जात असताना त्यांना काळेवाडी परिसरात दोन चोरट्यांनी अडवले आणि त्यांच्याकडील १४ लाख रुपये घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी वाकड पोलिसांनी अमन अजीम शेख आणि गणेश भुंगा कांबळे या दोन सराईतांना अटक केली आहे.


पिंपरीतील होलसेल कापड दुकानदार मोहनदास सिरुमल तेजवाणी (रा. विजयनगर काळेवाडी) हे दि. १८ ऑक्टोबर रोजी सायं.६.३० वा दुकानातील १४ लाख रुपयांची रोकड घेऊन दुचाकीवरून घरी जात असताना बालाजी लॉन्स समोर काळेवाडी येथे दोन चोरट्यांनी त्यांची रोकड लुटली होती.

त्यानंतर वाकड पोलिसांनी सिसीटीव्ही फुटेजच्या आधारे तसेच बातमीदारांचे मार्फत चोरट्यांचा शोध सुरु केला होता. आरोपींनी एक शाईन मोटार सायकल वापरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी वापरलेल्या मोटार सायकलसह काळेवाडी परीसरातून सुहास नवनाथ जोगदंड (वय २२ वर्ष रा. गिरजुबाबा मंदीरामागे ११ नंबर बिल्डींग शेजारी, बौध्दनगर, पिंपरी), आदित्य संतोष घायतडक (वय २१ वर्षे रा.१५ नंबर बिल्डींग शेजारी बौध्दनगर पिंपरी) या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यावेळी लुटलेली काही रक्कम आरोपींकडे मिळाली. आरोपींना पोलिसी खाक्या दाखविला असता या गुन्ह्यात त्यांनी अजुन दोन साथीदारांसह मिळुन ही लूट केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार अमन आजिम शेख (वय २० वर्षे रा. आर्य समाज चौक, पुनम फर्निचर जवळ, रामकृष्ण नगर, पिंपरी) आणि गणेश भुंगा कांबळे (वय २१ वर्षे रा. पाचपिर चौक, पंचनाथ कॉलनी, काळेवाडी, मुळ रा. भाटनगर, रेल्वे लाईन जवळ, निराधारनगर, शंकराचे मंदीराचे बाजुला पिपरी) यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी आरोपींकडे लुटलेल्या १४ लाखांपैक्की १० लाख ४० हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मो.सा. नं. एमएच. १४. जेएफ. २७५२ असा एकूण १२ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी अमन आजिम शेख व गणेश भुंगा कांबळे हे सराईत गुन्हेगार असून ते फरार होते. तसेच गणेश कांबळे यांच्या यापूर्वी एकुण १० गुन्हे, अमन शेख याच्यावर ०३ गुन्हे आणि आदित्य घायतडक याच्यावर ०१ गुन्हा दाखल आहेत.

सदरची कामगिरी वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल साळुंखे, सहायक पोलीस निरिक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरिक्षक सचिन चव्हाण, सहायक पोलीस फौजदार बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस हवालदार संदीप गवारी, स्वप्निल खेतले, दिपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, वंदु गिरे, पोलीस नाईक प्रशांत गिलबीले, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, पोलीस शिपाई अजय फल्ले, भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे, विनायक घारगे, रमेश खेडकर, सागर पंडीत यांनी केली आहे.