राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पिंपरी चिंचवड शहरात पथसंचलन उत्साहात

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पिंपरी चिंचवड शहरात पथसंचलन उत्साहात

     पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   राष्ट्रहित व सेवा कार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी निमित्ताने शहरात आज (दि.२४) रोजी तब्बल २५ ठिकाणी पथसंचलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत या पथसंचलनाचे स्वागत केले. सकाळी आकुर्डी, रावेत, हिंजवडी पूनावळे, वाकड थेरगाव, चिंचवड पूर्व – पश्चिम, पिंपरी, काळेवाडी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, कासारवाडी, संत तुकाराम नगर, आळंदी, मोशी, संभाजी नगर, चिखली,आळंदी या भागात पथसंचलन पार पडले.

तर देहू, देहूरोड, दिघी, चऱ्होली, भोसरी, इंद्रायणी नगर भागात सायंकाळी नियोजित मार्गावर पूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांचे सदंड पथसंचलन उत्साहात संपन्न होत आहेत. घोषाच्या तालावर हजारो स्वयंसेवकांनी संचलनात सहभाग घेऊन सामूहिकतेचे दर्शन घडविले. विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रमुख अतिथी, लोकप्रतिनिधी विविध भागातील संचलनात सहभागी झाले होते. ठिकठिकाणी नागरिकांनी उस्फूर्तपणे पुष्पवृष्टी, भारत माता की जय च्या  जयघोषात रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भव्य स्वागत केले.