गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप

गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप
गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप

  पिंपरी, (प्रबोधन न्यूज )  - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने काराची चौक पिंपरी व  चाफेकर चौक चिंचवड येथे गणेश मंडळांचे स्वागत करण्यात  आले . येत आहे याप्रसंगी  खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार उमाताई खापरे ,पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, उपायुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, अमित पंडित,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, माजी नगरसेवक, पत्रकार  तसेच  महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पारंपरिक वाद्य वादनात व अत्यंत शांततापूर्ण वातावरणात पिंपरीतील गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली.  दुपारी 4 च्या सुमारास पारंपरिक वाद्यांच्या गजरात सदानंद तरुण मंडळाचे प्रथम आगमन झाले. पिंपरीतील महापालिकेच्या वतीने मंडळाचे स्वागत करण्यात आले. गणेश भक्तांनी उत्साही वातावरणामध्ये गणरायाला निरोप दिला. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी पिंपरीतील कराची चौकात भव्य व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. शगुन चौकातून गणेश मंडळाचे बाप्पा दिमाखात येत होते. कोणत्याही केमीकलयुक्त गुलालाची उधळण करण्याला फाटा देत मंडळाकडून फुलांचा वापर करण्यात येत होता. मंडळाच्या गणरायाचं स्वागत केल्यानंतर रस्त्यावर पडलेली फुले व कचरा बाजूला करण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वच्छता करीत होते. 

गणेश मंडळाच्या स्वागतासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे यांनी पिंपरीतील मंडळांचे स्वागत केले. यावेळी विशेष अधिकारी किरण गायकवाड, सुरक्षा विभागाचे प्रमुख उदय जरांडे, सुरक्षा रक्षक, आरोग्यसेवक यावेळी उपस्थित होते.

दुपारी 5 वाजता शिव मित्र मंडळाचे आगमन झाले. त्यानंतर अर्ध्या तासाने मडले यायला सुरुवात झाली. जय भारत मित्र मंडळ, जय भीम मित्र मंडळ, फाईव्ह स्टार तरुण मंडळ आदी मंडळे येऊन गेली. पारंपरिक ढोल, ताशा, लेझीम आणि हलगिच्या तालावर गणेश भक्तानी ठेका धरला होता. महापालिके तर्फे स्वागत सत्कार केल्यानंतर मांडले पिंपरीतील विसर्जन घाटाकडे रवाना होत होती. 

Files