भारताचे तेजस चीन आणि पाकिस्तानच्या JF-17 पेक्षा जास्त धोकादायक, हॅमर मिसाइल्सने सुसज्ज

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भारताचे तेजस चीन आणि पाकिस्तानच्या JF-17 पेक्षा जास्त धोकादायक, हॅमर मिसाइल्सने सुसज्ज
नवी दिल्ली - 
भारताचे स्वदेशी फायटर जेट लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस (LCA तेजस) आता आणखी घातक ठरणार आहे. आता हे विमान युद्धासारख्या परिस्थितीत ७० किमी दूर बसलेल्या शत्रूचे बंकर उद्ध्वस्त करेल. वास्तविक, भारतीय वायुसेना तेजसची मारक क्षमता वाढवणार आहे, त्यासाठी फ्रान्सकडून हॅमर क्षेपणास्त्रांची ऑर्डर देण्यात आली आहे, जे तेजसमध्ये तैनात असतील.

0 चीन-पाकिस्तानला स्पष्ट संकेत
चीन आणि पाकिस्तानसोबत भारताचा संघर्ष वाढला असताना भारतीय हवाई दल तेजसची क्षमता वाढवत आहे. चीन LAC वर दररोज हिंसक परिस्थिती निर्माण करत आहे. अशा परिस्थितीत तेजसची क्षमता वाढवून भारतीय हवाई दलाला पाकिस्तान आणि चीनला सडेतोड उत्तर द्यायचे आहे.

0 हवेतून जमिनीवर हल्ला करण्याची क्षमता वाढेल
फ्रान्सचे हॅमर क्षेपणास्त्र हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र 70 किमी अंतरावरील शत्रूच्या सर्वात कठीण लक्ष्यांवर मारा करू शकते. राफेल विमान भारतात आल्यावर हॅमर मिसाईलची पहिली खेप भारताला मिळाली. आता भारत आणखी हॅमर क्षेपणास्त्रांची मागणी करेल आणि ते तेजसमध्ये तैनात करेल, यामुळे भारतीय हवाई दलाची हवेतून पृष्ठभागावर मारा करण्याची क्षमता वाढेल.

0 तेजस हे चीन-पाकिस्तान विमानापेक्षाही धोकादायक
भारताचे तेजस लढाऊ विमान हे चीन आणि पाकिस्तानच्या JF-17 विमानांपेक्षा अधिक सक्षम आणि प्रगत मानले जाते. अशा परिस्थितीत हॅमर क्षेपणास्त्रासारख्या नवीन अपडेट्समुळे हे विमान JF-17 ला ऑपरेशनल आणि फायर क्षमतांमध्ये खूप मागे सोडेल.