पुणे शहरात दोन दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर एनआयएचे महासंचालक शहरात, पोलीस आयुक्तांशी गुफ्तगू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुणे शहरात दोन दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर एनआयएचे महासंचालक शहरात, पोलीस आयुक्तांशी गुफ्तगू

पुणे , (प्रबोधन न्यूज )  -  पुणे शहरात दोन दशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. एका मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात पकडण्यात आले ते दोन आरोपी होते. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार फरार झाला. मग पुणे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर एनआयएच्या यादीत मोस्ट वॉटेंड असणारे इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी असल्याचे समोर आले. यानंतर या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक झाली. त्यानंतर इसिस प्रेमी डॉक्टर डॉ.अदनान अली सरकार याला एनआयएने अटक केली. या प्रकारानंतर एनआयएचे महासंचालक पुणे शहरात आले.

एनआयए महासंचालक भेटले आयुक्तांना

पुणे पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर एनआयएचे महासंचालक पुण्यात आले. एनआयएचे महासंचालक दिनकर गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्त रितेशकुमार यांची भेट घेतली. गुप्ता यांनी आयुक्त रितेशकुमार यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. तसेच ते दोघे दहशवादी पुणे आणि मुंबई शहरात बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपासातून पुढे आली. यामुळे एनआयएसह देशातील सर्व तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. गुप्ता यांनी यावेळी पुणे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. या भेटी दरम्यान राज्यातील एनआयएचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

पुणे दहशतवादी चौघांना कोठडी

इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी आणि या दहशतवाद्यांना मदत करणारे इतर दोघे अशा चारही जणांना पुणे जिल्हा न्यायालयाने ११ ऑगस्टपर्यंत कोठडी दिली आहे. या चारही आरोपीकडून अनेक संशयास्पद वस्तू मिळून आल्या असल्याचा ATS कडून न्यायालयात सांगण्यात आले.