प्रसाद सस्ते आणि समाधान दगडे यांची महाराष्ट्र केसरी साठी निवड 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

प्रसाद सस्ते आणि समाधान दगडे यांची महाराष्ट्र केसरी साठी निवड 
पिंपरी, (प्रबोधन न्यूज )  -  पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी निवड कुस्ती चाचणी स्पर्धेत पै. प्रसाद सस्ते आणि पै. समाधान दगडे यांची महाराष्ट्र केसरी साठी निवड झाली आहे.
   महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य अधिवेशन ६६ वे आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब लढत आयोजित करण्यात आली आहे. यासाठी पिंपरी चिंचवड शहर कुस्तीगीर संघाने  वाकड, कावेरी नगर क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या निवड चाचणी स्पर्धेत गादी विभागातून (८६ ते १२५ किलो महाराष्ट्र केसरी गट) मोशीचा पै. प्रसाद सस्ते आणि आकुर्डीचा पै. संकेत घाडगे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. यामधे पै. सस्ते याने विजय मिळवून महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब लढती साठी प्रवेश निश्चित केला. माती विभागातून भोसरीचा पै. समाधान दगडे आणि आकुर्डीच्या पै. तन्मय काळभोर यांच्यामध्ये लढत झाली. पै. दगडे याने विजय मिळवून महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब लढतमध्ये प्रवेश मिळवला.
माती विभागातील सविस्तर निकाल पुढील प्रमाणे : 
५७ किलो वजन गट अजिंक्य माचुत्रे  (चिंचवड) विजयी विरुद्ध ओंकार नलावडे  (एच. ए. तालीम); 
६१ किलो वजन गट संकेत माने (आकुर्डी) विजयी विरुद्ध उद्धव कुलथे (चिखली);  
६५ किलो वजन गट केदार लांडगे(भोसरी) विजयी विरुद्ध अमित म्हस्के (भोसरी);  
७० किलो वजन गट कुणाल कस्पटे (वाकड) विजयी विरुद्ध व्यंकटेश देशमुख (चिखली);  
७४ किलो वजन गट रवींद्र गोरड (पिंपरी) विजयी विरुद्ध कार्तिक फुगे (भोसरी);  
७९ किलो वजन गट अनिकेत लांडे (भोसरी) विजयी विरुद्ध जतिन कांबळे (पिंपळे नीलख);  
८६ किलो वजन गट यशराज अमराळे (चऱ्होली) विजयी विरुद्ध प्रथमेश मोरे (भोसरी);  
९२ किलो वजन गट यश नखाते (रहाटणी) विजयी विरुद्ध तेजस फेंगसे (ताथवडे);  
९७ किलो वजन गट अक्षय करपे (चिखली) विजयी विरुद्ध शुभम गवळी (भोसरी);  
गादी विभागातील सविस्तर निकाल पुढील प्रमाणे : 
५७ किलो वजन गट प्रणव सस्ते (मोशी) विजयी विरुद्ध श्री जाधव (आकुर्डी); 
६१ किलो वजन गट योगेश्वर तापकीर (चऱ्होली) विजयी विरुद्ध रुद्र वाळुंजकर (पिंपरी);  
६५ किलो वजन गट महेश जाधव (भोसरी) विजयी विरुद्ध ऋतिक नखाते (रहाटणी);  
७० किलो वजन गट परशुराम कॅम्प (आकुर्डी) विजयी विरुद्ध स्वप्निल सकुंडे (वाल्हेकर वाडी, चिंचवड);  
७४ किलो वजन गट यश सहाने (दिघी) विजयी विरुद्ध साहिल गायकवाड (रहाटणी);  
७९ किलो वजन गट पवन माने (आकुर्डी) विजयी विरुद्ध विशाल कोळी (दिघी);  
८६ किलो वजन गट सौरभ शिंगाडे (किवळे) विजयी विरुद्ध यश थोरवे (चऱ्होली);  
९२ किलो वजन गट सौरभ जाधव (दिघी) विजयी विरुद्ध गौरव वाघेरे (पिंपरी);  
९७ किलो वजन गट निरंजन बालवडकर (पिंपळे नीलख) बिनविरोध विजयी.
   या स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघाचे सचिव पैलवान संतोष माचूत्रे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, दिलीप बालवडकर, भारत केसरी पैलवान विजय गावडे तसेच अनुप मोरे, तेजस्विनी कदम, काळूराम कवितके, अरुण तांबे, पंडित मोकाशी, बबन बोऱ्हाडे, राजू कुदळे, रतन लांडगे, नवनाथ नढे, दिलीप काळे, सुनील कुलथे, सुरेश वाळुंज, ज्ञानेश्वर कुटे, विजय पाटुकले, किशोर नखाते, अजय लांडगे, अभिषेक फुगे आदी उपस्थित होते. पंच म्हणून विजय कुटे, रोहिदास आमले, विक्रम पवळे, बाळासाहेब काळजे यांनी काम पाहिले. तर या निवड चाचणी स्पर्धेमध्ये एकूण ११० खेळाडूंनी सहभाग घेतला होता तर ९० लढती झाल्या.
स्वागत पै. विजय गावडे, सूत्रसंचालन पै. संतोष माचुत्रे तर आभार पै. ज्ञानेश्वर कुटे यांनी मानले.