एका सायबर गुन्ह्याचा शोध घेता घेता लागला मोठ्या रॅकेटचा शोध

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

एका सायबर गुन्ह्याचा शोध घेता घेता लागला मोठ्या रॅकेटचा शोध

झेरॉक्सच्या दुकानातील कचरा विकत घेण्यासाठी नेमली मुले

पुणे, दि. 16 मे - दोन दिवसांपूर्वी एका सायबर गुन्हेगाराचा शोध घेत घेत आमचे तपास पथक खडकी कॅन्टोन्मेंट येथील एका चाळ वजा झोपडपट्टीत पोहोचले, दोन तासांच्या प्रतिक्षे नंतर हवा असणारा गुन्हेगार सापळ्यात अडकला, त्याच्या खोलीची झडती घेतली असता तिथे डोक्याइतक्या उंचीचा कागदांचा व्यवस्थित लावलेला ढीग होता, त्यातून धक्कादायक माहिती उघडकीस आली, त्या खोलीत 21/22 वर्षाची बाहेरच्या राज्यातील 5 मुले राहत होती, त्यातील तीन जणांकडून 185 सिमकार्ड, 16 स्मार्ट फोन, दोन अद्यावत लॅपटॉप जप्त केले, एवढी जास्त सिमकार्ड कशी मिळवली याचा खोलात जाऊन तपास केला असता एखाद्या सिनेमात शोभेल अशी माहिती समोर आली असे सायबर क्राईम ब्रँचचे अमोद वाघ यांनी सांगितले.

या गुन्हेगारांनी शहरातील चांगल्या एरियातील मोठमोठ्या झेरॉक्सच्या दुकानातील कचरा गोळा करण्यासाठी पगारी मुले मुली नेमले होते, गोळा झालेल्या झेरॉक्सच्या कचर्‍यातून आधार कार्ड, पॅन कार्ड, लाइट बिल, रेशन कार्ड... ई पेपर वेगळे काढून त्याचा वापर नवीन/डुप्लिकेट सीम कार्ड मिळविण्यासाठी केला होता व यात वेगवेगळ्या सरकारी ऑफिस समोरील झेरॉक्सच्या टपरीवाले, फुटपाथवरील नवीन सिमकार्ड, फोन रीचार्ज करून देणारे सामील होते.

उपाय -

1) आधार, पॅन, लाइट बिल अशा KYC साठी लागणार्‍या पेपरच्या झेरॉक्स चांगल्या प्रतिष्ठित दुकानातूनच काढाव्यात व त्याची पावती जरूर घ्यावी.

KYC पेपरच्या झेरॉक्सवर लाल पेनाने कशासाठी देत आहे - Use for..... Purpose Only. असा स्पष्ट उल्लेख आठवणीने करावा.

2) आपल्या नावावर किती सिमकार्ड रजिस्टर आहेत ते शोधून नको असणारी, वापरात नसणारी, स्वतःची नसणारी सिमकार्ड DELIT/REMOVE करण्यासाठी रीपोर्ट सबमीट करावा, त्यासाठी भारतीय दूरसंचार विभागाच्या ऑफिशियल TAFCOP (Telecom Analytics for Fraud Management & Customer Protection) या साइट वर जाऊन आपला आधार कार्डला जॉईन असलेला मोबाईल नंबर टाकावा, ते टाकल्यावर तुमच्या नावावर संपूर्ण भारतात किती मोबाईल नंबर लिस्टेड आहेत त्याची यादी खाली दिसेल, त्यातील नको असणारे, स्वतःचे नसणारे नंबर सिलेक्ट करून रीपोर्ट सबमीट करावा, DOT (दूरसंचार विभाग) कडून रीपोर्ट केलेले नंबर बंद केले जातील.

3) आपला फोन (सिमकार्ड) हॅक झाले आहे का हे तपासण्यासाठी  #62#  हे डायल करावे, हे डायल केल्यावर डिटेल्ड रीपोर्ट आपल्या स्क्रीन वर येईल, त्या रीपोर्ट मधील प्रत्येक ठीकाणी NOT FORWARD असेच यायला हवे अन्यथा आपले सिमकार्ड हॅक/क्लोन झालेले असते.

4) जर आपले सिमकार्ड कॉम्प्रमाईज झाले आहे असे आढळले तर हॅकिंग डिस्कनेक्ट करण्यासाठी #002# हा कोड डायल करावा,त्याने सर्व प्रकारचे फॉरवर्डस थांबतील,  यानंतर वेळ न घालवता आपल्या सर्विस प्रोव्हायडरच्या अधिकृत कस्टमर केअर दुकानातून सिमकार्ड बदलून नवीन घ्यावे व जुन्या सिमकार्डचे दोन तुकडे करावेत.

5) आपल्या हॅण्डसेट मध्ये स्पायवेअर इन्स्टॉल झाले आहे का हे बघण्यासाठी गूगल प्ले स्टोअर मधील मेन मेन्यू वर जाऊन प्ले प्रोटेक्ट वर क्लीक करावे व फोन पूर्ण स्कॅन करावा.

अपायकारक App सापडल्यास त्वरित डिलीट करावे. तसेच मोबाईल मध्ये चांगल्या कंपनीचे फक्त विकत घेतलेलेच अ‍ॅण्टी व्हायरस जरूर इन्स्टॉल करावे व त्याद्वारे दर 3/4 दिवसांनी संपूर्ण फोन स्कॅन करावा.

शेवटी हे सगळे प्रकार आपल्याच चुकीमुळे, बेसावध/बेजबाबदार पणानेच घडलेले असतात, म्हणून सायबर सुरक्षेचा मूल मंत्र कधीही विसरू नये. म्हणतात ना "सावधानी हटी तो दुर्घटना घटी"

Be Vigilant, Be Cyber Smart & Stay Safe.....

Amod Wagh

Maharashtra Cyber Cell