फडणवीसांनी आरोपांना नवाब मलिकांचे प्रत्युत्तर; फडणवीसांचेच अंडरवर्ल्डशी संबंध; उद्या पत्रकार परिषदेत देणार माहिती

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

फडणवीसांनी आरोपांना नवाब मलिकांचे प्रत्युत्तर;  फडणवीसांचेच अंडरवर्ल्डशी संबंध; उद्या पत्रकार परिषदेत देणार माहिती

मुंबई - 

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असून त्यांनी दाऊदच्या माणसांकडून जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी केले आहेत. त्यालाच आता मंत्री नवाब मलिकांनी उत्तर दिले आहे. मी कोणत्याही बॉम्बब्लास्ट प्रकरणातील आरोपीकडून जमीन खरेदी केली नाही. उलट फडणवीसांचेच अंडरवर्ल्डशी संबंध असून उद्या त्याबाबत पत्रकार परिषदेमध्ये माहिती देणार असल्याचा पलटवार नबाब मलिक यांनी केला आहे.

सरदार वली खान हा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असून त्याच्याकडून गोवावाला कंपाऊंड येथील मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला. त्यालाच उत्तर देताना मलिक म्हणाले, ''सरदार वली खानचं आज पण गोवावाला कंपाऊंडमध्ये घर आहे. आधी त्याच्या वडिलांचे घर होते. सरदारवली खानचे वडिल तिथे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. तिथे भाडं वसूल करण्याचं काम करत होते. त्यांनी सातबाऱ्यावर स्वतःचं नाव चढवून घेतलं होतं. आम्ही देखील तिथे भाडेकरू म्हणून राहत होतो. त्यावेळी जागेच्या मालकिणीने आम्हाला मालकी हक्क घेण्यास सांगितले. त्यावेळी सुरक्षारक्षकाचं नाव काढण्यासाठी आम्ही पैसे दिले होते हे खरं आहे'', असं नवाब मलिक म्हणाले.
''कुठल्याही बॉम्बब्लास्टमधील आरोपींकडून आम्ही जमीन खरेदी केली नाही. मी केलेला व्यवहार अचूक होता. तो बॉम्बब्लास्टमधील आरोपी आहे हे जगाला माहिती आहे. पण, त्याने जमीनीवर नाव चढवून घेतल्यानंतर आम्ही काय करणार? ते नाव काढण्यासाठी आम्ही त्याला पैसे दिले'', असेही नवाब मलिक म्हणाले.

आमचे नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांचेच अंडरवर्ल्डशी जवळचे संबंध राहिलेले आहेत. त्याबाबत उद्या सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेऊन हायड्रोजन बॉम्ब फोडणार असून त्याबाबत आपण पुरावे सादर करू असेही नबाब मलिक म्हणाले. मलिक हे उद्या फडणवीस आणि अंडरवर्ल्डबाबत काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.