आयटी पार्क मधील कर्मचाऱ्यांना लुटण्याचा डाव वाकड पोलिसांनी उधळला तिघांना अटक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आयटी पार्क मधील कर्मचाऱ्यांना लुटण्याचा डाव वाकड पोलिसांनी उधळला तिघांना अटक

     पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   रात्रीच्या वेळी आयटी कंपनीतील कर्मचारी घरी जात असताना त्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा डाव वाकड पोलिसांनी उधळून लावला. जगताप डेअरी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रहाटणी येथे दबा धरून बसलेल्या चौघांना पोलिसांनी पकडले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 15) पहाटे दोन वाजताच्या सुमारास करण्यात आली.

वेंकटेश सुरेश नाईक (वय 24), चेतन काकासाहेब वाघमारे (वय 23), शेखर काळूराम जांबूरे (वय 19, तिघे रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचा एक साथीदार पळून गेला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विनायक घारगे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी मधून जगताप डेअरी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काहीजण संशयितपणे थांबले असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन चौघांना ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच एकजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. ताब्यात घेतलेल्या चौघांकडून एक तलवार, दोन कोयते, मिरची पूड, दोन मोबाईल फोन, एक दुचाकी असा एकूण 20 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ताब्यात घेतलेल्या चौघांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, या मार्गाने रात्रीच्या वेळी आयटी मध्ये काम करणारे कर्मचारी जात असतात. त्यांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून त्यांना लुटण्याचा कट रचला होता. वाकड पोलीस तपास करीत आहेत.