महापालिकेच्या वतीने केलेल्या कारवाईत डासोत्पत्ती स्थानधारकांकडून १८ हजार दंड वसूल
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत किटकनाशक विभागाकडून निगडीतील भेळ चौक येथील बांधकाम साईटची तपासणी केली असता सदर ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्याने संबंधितांवर "डास उत्त्पत्ती स्थानांची निर्मिती" या शिर्षकाखाली दंड प्रमाणांनुसार दंडात्मक कारवाई करणेत येऊन ४ जणांकडून प्रत्येकी २ हजार याप्रमाणे ८ हजार आणि एकाकडून १० हजार असा एकूण १८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
सदरची कारवाई क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सहाय्यक आरोग्याधिकारी राजू साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरिक्षक अंकुश झिटे यांनी केली असून त्यांचेसोबत मलेरिया इन्स्पेक्टर अश्विनी शेटे, मुकादम राकेश गायकवाड तसेच किटकनाशक विभागातील कर्मचारी आणि ग्रीनमार्शल पथकाचे जवान उपस्थित होते.औद्योगिक, बांधकाम आस्थापना, कार्यालये, गृहसंस्था, घरे तसेच व्यावसायिक दुकानांसह सर्व आस्थापनांनी आपल्या ठिकाणी असलेली डास उत्पत्ती स्थळे तात्काळ नष्ट करावीत, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त शेखर सिंह यांनी नुकताच दिला होता.
डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध भागांची तपासणी करून नोटीस बजावण्याची कारवाई महापालिकेने मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे.शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या तपासणी पथकातील कर्मचारी तपासणीसाठी आल्यास त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही महापालिकेने यापूर्वी केले आहे. शहरात सुरू असलेल्या विविध बांधकामाच्या साईटवर महापालिकेने विशेष लक्ष केंद्रीत केले असून त्या भागांची तपासणी करून संबंधितांना नोटीसा बजावण्यात येत आहेत शिवाय अशी ठिकाणे आढळून आलेल्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
वैद्यकीय विभागाने तपासणी केलेल्या रुग्णांच्या यावर्षीच्या अहवालात आतापर्यंत सुमारे १ हजार १४ पेक्षा जास्त संशयितांना डेंग्यूसारखी लक्षणे आढळून आली आहेत. घराच्या आत आणि बाहेर स्वच्छ पाण्याने भरलेल्या कंटेनरमध्ये डासांची उत्पत्ती होत असते, शिवाय घरातील फ्लॉवर-पॉट, मनी प्लांट्स आणि फ्रीज ड्रिप पॅनमधील पाण्यात देखील अशी उत्पत्ती आढळून येते यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अशा साधनांची नागरिकांनी नियमितपणे तपासणी करणे देखील आवश्यक आहे.
महापालिकेच्या रुग्णालयांत तसेच दवाखान्यांमध्ये डेंगूच्या तपासणीकरिता आवश्यक असलेले रॅपिड किट उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. किटकजन्य रोग नियंञणासाठी स्वच्छ पाण्यात गप्पी मासे सोडणे, नागरिकांच्या घरांच्या कंटेनरचे सर्वेक्षण, व्यवसायाच्या ठिकाणांचे सर्वेक्षण केले जात असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय तसेच आरोग्य विभागाने दिली. पावसाळ्यात हिवताप, डेंग्यु, चिकुनगुन्या सारखे रोग पसरू नयेत म्हणून महापालिकेने खबरदारी घेतली असून शहरातील डेंग्यू,मलेरिया प्रतिबंधक मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आणि आरोग्य विभाग प्रमुख यशवंत डांगे यांनी केले आहे.