मतदार याद्या अद्ययावत करण्यास सुरुवात निवडणुकीचे संकेत - बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

मतदार याद्या अद्ययावत करण्यास सुरुवात  निवडणुकीचे संकेत - बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

पिंपरी,  (प्रबोधन न्यूज )  - आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वतीने मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम घेणे, त्यांतर्गत मतदार यादी पडताळणी, मतदार यादी फोटो बदलणे, मयत मतदारांचे नाव वगळणे, वंचित घटक, महिला-दिव्यांग-तृतीय पंथीयांसाठी विशेष कार्यक्रम राबविण्याबाबतच्या सूचना मतदार नोंदणी अधिकारी निलेश देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

निवडणूक संदर्भात अधिकाऱ्यांची पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरात 205 चिंचवड विधानसभा मतदार संघांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व पदनिर्देशित अधिकारी (नोडल) यांची सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत बैठक घेण्यात आली. यावेळी मतदार नोंदणी अधिकारी निलेश देशमुख, तहसिलदार तथा अतिरिक्त सहा मतदार नोंदणी अधिकारी अमोल कदम, नायब तहसीलदार श्‍वेता अल्हाट, सहा.आयुक्त उमेश ढाकणे, शितल वाकडे, किरणकुमार मोरे, अमित पंडित व सहा. मतदार नोंदणी अधिकारी आदी उपस्थित होते.

1 जानेवारी 2024 रोजीच्या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यांतर्गत 80 हून अधिक मतदारांबाबत पडताळणी, मतदार यादीतील ब्लर फोटो दुरुस्ती, मयत मतदारांची नावे वगळणे, बीएलओ, वोटर हेल्पलाइन, निवडणूक विभागाचे पोर्टल याची माहिती देण्यात आली. चर्च तसचे स्वीप कार्यक्रमांतर्गत वंचीत घटक, महिला, दिव्यांग, तृतीयपंथीयांसाठी विविध कार्यक्रम राबविण्याच्या सुचना देण्यात आल्या. 2019 च्या निवडणुकीत ज्या भागात कमी मतदान झाले आहे, त्याठिकाणच्या मतदान केंद्रांवर जाऊन जनजागृती करण्यात यावी, विशेष कार्यक्रम राबविण्यात यावेत, अशाही सूचना देण्यात आल्या.