ठाकरे शिवसेनेतर्फे चिंचवडमध्ये रोजगार मेळावा उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ठाकरे शिवसेनेतर्फे चिंचवडमध्ये रोजगार मेळावा उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना चिंचवड विधानसभेचे शहर संघटक संतोष सौंदणकर, शिवसेना विभाग प्रमुख संदीप भालके आणि जिजाऊ सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा ज्योती भालके यांच्या वतीने रोजगार मेळावा भरविण्यात येणार आहे.

हा मेळावा रविवारी (दि. 16) चिंचवडगावातील चिंचवडे लॉन्समध्ये दुपारी 1 ते सायंकाळी 7 या वेळेत होणार आहे. यावेळी कार्यक्रमास माजी मंत्री तथा पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहेर, उपनेते रवींद्र मिर्लेकर, चिंचवड विधानसभा संपर्कप्रमुख दिलीप घोडेकर, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, जिल्हाप्रमुख अरुण चाबुकस्वार, शहर प्रमुख ऍड. सचिन भोसले, शहर संघटिका अनिता तुतारे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे उपस्थित राहणार आहेत.


मेळाव्याला येताना हे करा
अनेक राष्ट्रीय आणि बहुरराष्ट्रीय कंपन्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. मेळाव्यात अल्पशिक्षित ते उच्चशिक्षित सर्वांना सहभागी होता येणार आहे. उमेदवारांनी बायोडाटा व मुळ कागदपत्रे, पासपोर्ट साइज फोटो, आधारकार्ड, मतदान कार्ड सोबत आणावे. अर्ज स्वीकृती आणि मुलाखत एकाच वेळी होणार असुन पात्र उमेदवारांची नोकरीसाठी जागेवरच निवड केली जाणार आहे. मोठ्या संख्येने युवक आणि बेरोजगार तरुणांनी मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संदीप भालके यांनी केले आहे.

माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाला नवसंजीवनी मिळावी याकरिता बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण उक्तीला अनुसरून लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. तसेच, पक्षप्रमुखांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करून पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व शिवसैनिक एकजुटीने कामाला लागले आहेत. त्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यातून गद्दारांना पक्षाची ताकद दिसेल.

- संतोष सौंदणकर, शहर संघटक, ठाकरे शिवसेना