श्री फाउंडेशनतर्फे वाकड पोलीस ठाण्यात मोफत आरोग्य शिबीर, चष्मे वाटप उत्साहात 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

श्री फाउंडेशनतर्फे वाकड पोलीस ठाण्यात मोफत आरोग्य शिबीर, चष्मे वाटप उत्साहात 
पिंपरी -

वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. डॉ. विवेक मुगलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री फाउंडेशन व वाकड पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनी वाकड पोलिस स्टेशन येथे मोफत आरोग्य शिबीर व चष्मे वाटप करण्यात आले. आरोग्यामध्ये जनरल चेकअप, हाडांची तपासणी, दातांची तपासणी, डोळ्याची तपासणी करण्यात आली. यावेळी जनरल फिजिशियन डॉक्टर रवींद्र द्विवेदी आणि डॉक्टर संतोष नगरकर, हाडांचे डॉक्टर विष्णू नांदेडकर, दातांचे डॉक्टर आरती गांधी, तर ऑप्टीशीयन श्रद्धा खामकर यांनी जवळपास ७८ (पोलीस, शांतता सदस्य, दक्षता सदस्य, वरिष्ठ  नागरिक) लोकांची तपासणी केली.

यावेळी श्री फाउंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष सुशांत पांडे, प्रशांत जाधव, दादाराव आढाव, मदन जोशी,  संतोष बोरले,  अविनाश रानवडे, आदींनी परिश्रम घेतले. तसेच वाकड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगलीकर, गुन्हे शाखेचे पोलीस संतोष पाटील, तपस पथक पोलीस उपनिरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस निरीक्षक घाडगे, पोलीस उपनिरीक्षक अनिल लोहार, अविनाश पवार,  ठाकूर, पोलीस सहनिरिक्षक गणेश तोरगल, अवधूत शिंगारे, दीपक काडमाने, हवलदार दिपक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.                                  

कार्यक्रमात डॉ. विवेक मुगलिकर व संतोष पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात केली डॉक्टर विवेक नांदेडकर यांनी हाडांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. श्री फाऊंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष सुशांत पांडे यांनी सर्वांचे आभार मानले.