जमिनीच्या वाटणीच्या कारणावरून भावावर विळ्याने वार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

जमिनीच्या वाटणीच्या कारणावरून भावावर विळ्याने वार

     पिंपरी , (प्रबोधन न्यूज )   -   जमिनीच्या वाटणीच्या कारणावरून भावाने भावावर विळ्याने वार केले. ही घटना सोमवारी (दि. 10) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास कुरुळी येथे घडली.

मंगेश शांताराम गायकवाड (वय 40, रा. कुरुळी गायकवाड वस्ती, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज शांताराम गायकवाड, आणि त्याची पत्नी (दोघे रा. कुरुळी, गायकवाड वस्ती, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वाटणीच्या कारणावरून फिर्यादी यांचा भाऊ आणि त्याच्या पत्नीने फिर्यादी यांच्या आईसोबत भांडण काढले. आईला शिवीगाळ करत असताना फिर्यादी तिथे गेले असता भाऊ मनोज याने फिर्यादी यांच्यावर विळ्याने वार केले. तसेच भावाच्या पत्नीने फिर्यादी यांना कुंडी मारून दुखापत केली. तसेच पाण्याच्या स्टीलच्या बाटलीने पाठीत मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.