भाजपाच्या चार महिला आमदाराची झाली आर्थिक फसवणूक
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, (प्रबोधन न्यूज) - वैद्यकीय मदतीसाठी पैशाची मागणी करुन आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह 4 महिला आमदारांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी आमदार माधुरी मिसाळ यांची कन्या पूजा (रा. कॅम्प) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १३२/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मुकेश राठोड व गुगल पे फोन धारकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार माधुरी मिसाळ यांच्या मोबाईलवर मुकेश राठोड याने फोन केला. आपल्या आईला बाणेर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून, तिच्या औषधोपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्यांना एक गुगल पेचा नंबर देऊन त्यावर ३ हजार ४०० रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार मिसाळ यांनी पैसे पाठविले. त्यांच्या प्रमाणेच विधानसभेतील त्यांचे सहकारी आमदार मेघना बोर्डिकर साकोरे, आमदार देवयानी फरांदे आणि आमदार श्वेता महाले यांच्याकडूनही अशा प्रकारे काही रक्कम घेऊन फसवणूक केली.
याप्रकरणी पूजा सतीश मिसाळ यांनी अगोदर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यांनी प्राथमिक तपास करुन पुढील तपासासाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे तपास करीत आहेत.