एका दिवसात दोन लाख उतारे डाउनलोड सरकारला 16 लाख 61 हजारांचा महसूल : पीककर्जासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - सध्या पेरणीचे दिवस असल्याने राज्यात खरीप हंगामाच्या पीककर्जासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सातबारा, खाते उतारे (आठ अ), फेरफार व मिळकत पत्रिका आदी उताऱ्यांना मागणी वाढली आहे. भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावरून गुरुवारी (दि. 6) राज्यात विक्रमी 2 लाख 15 हजार उतारे डाऊनलोड झाले आहेत. यामुळे सरकारलाही सुमारे 36 लाख 61 हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
राज्य राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ई-फेरफार प्रकल्पांतर्गत डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा, आठ-अ अर्थात खाते उतारा, मिळकत पत्रिका ऑनलाइन उपलब्ध झाल्या उतारे उपलब्ध झाले आहेत. सप्टेंबर 2019 पासून डिजिटली स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे उपलब्ध झाले आहेत. तेव्हापासून आजवर 4 कोटी 37 लाख 36 हजार 946 सातबारा उतारे डाऊनलोड झाले आहेत. ऑनलाइन उतारे डाऊनलोड करताना बॅंकेसंदर्भात असलेल्या अडचणी दूर झाल्याने 1 ऑगस्ट 2020 पासून खाते उतारे अर्थात 8 अ ऑनलाइन उपलब्ध झाले आहेत. आतापर्यंत 1 कोटी 30 लाख 72 हजार 527 उतारे डाऊनलोड झाले.
त्यानंतर 21 जानेवारी 2021 पासून मिळकत पत्रिका उपलब्ध झाल्या. आतापर्यंत राज्यात 8 लाख 16 हजार 773 पत्रिका नागरिकांनी डाऊनलोड केल्या आहेत. 1 ऑगस्ट 2021 पासून फेरफार ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले. आतापर्यंत 13 लाख 58 हजार 85 फेरफार डाऊनलोड करण्यात आले. यातून आतापर्यंत 112 कोटी 61 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. राज्यात यापूर्वी एकाच दिवशी सर्वाधिक उतारे 3 एप्रिल रोजी डाऊनलोड करण्यात आले.
पोर्टलचा सर्वाधिक वापर
पोर्टलवरील त्रुटी आता दूर करण्यात आली आहे. पोर्टलवरील बॅंका सक्षमपणे पैसे व्यवहारांतील समस्या सोडवून नागरिकास त्याने जमा केलेले पैसे परत करत आहेत. पोर्टलवरील वॉलेटमध्ये जमा रकमा या अधिकाराभिलेख डाऊनलोड करण्यासाठी केव्हाही वापरता येत आहेत. पेरणीचे दिवस असल्याने पीककर्ज इत्यादी बाबींसाठी सातबाराची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांनी या पोर्टलचा अधिक वापर केला आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाकडून देण्यात आली आहे.
दुरुस्तीसाठी तलाठ्यांशी संपर्क साधा
प्रत्येक नागरिकाने आपल्या जमिनीशी संबंधित अधिकाराभिलेख म्हणजेच सातबारा व आठ अ हे त्यांनी ज्या हंगामामध्ये पीक लावले आहे, अशा प्रत्येक हंगामासाठी कायदेशीर पुरावा म्हणून या पोर्टलवरून डाऊनलोड करून संग्रही ठेवावे. तसेच आपल्या सातबारा उताऱ्यात काही त्रुटी असल्यासही उतारा डाऊनलोड करून ती दुरुस्त करता येते. त्यासाठी तलाठ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन भूमी अभिलेख विभागाचे माहिती व तंत्रज्ञान कक्षाकडून करण्यात आले आहे.