आळंदीत माऊलींचे पालखी रथ बैलजोडीची मिरवणूक भोसले परिवार मानकरी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
आळंदी ( प्रबोधन न्यूज) - येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यातील श्रींचा वैभवी रथ ओढणा-या बैलजोडीचा यावर्षी तुळशीराम भोसले आणि रोहित भोसले यांना मान मिळाला असून त्यांनी रथ ओढण्यास आणलेल्या बैलजोडीची आळंदीत भोसले निवास स्थानापासून श्री भैरवनाथ मंदिर, नगरप्रदक्षिणा मार्गे माऊली मंदिर अशी भव्य मिरवणूक हरिनाम जयघोषात झाली. यावेळी शहरात ठीक ठिकाणी ग्रामस्थांनी बैलजोडीची पूजा करीत स्वागत उत्साहात केले.
माऊलींचे मंदिर महाद्वारात ज्ञानेश्वर महाराज संस्थान तर्फे बैलजोडीची पूजा करण्यात आली. यावेळी पालखी सोहळा प्रमुख विधीतज्ञ विकास ढगे पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक, तुकाराम माने, सोमनाथ लवंगे, माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, विलास घुंडरे, रोहित भोसले, विष्णू वाघमारे, श्रींचे मानकरी योगिराज कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली घुंडरे पाटील, ज्ञानेश्वर दिघे, ज्ञानेश्वर गुळुंजकर, पुष्प सजावटीचे सेवेकरी सुदीप गरूड आदी उपस्थित होते.
श्रींचा वैभवी पालखी सोहळा काही दिवसांवर आल्याने येथे तयारीला वेग आला आहे. भव्य मिरवणूक सवाद्य, फटाक्यांचे आतिषबाजी जल्लोषात झाली. यावेळी आळंदी देवस्थानचे बैल समितीने दिलेल्या मंजुरी प्रमाणे येथील ग्रामस्थ तुळशीराम भोसले आणि रोहित भोसले यांनी श्रींचे सोहळ्याचे वैभव वाढविण्यासाठी रथाची बैलजोडी लक्षवेधी खरेदी करून श्रींचे पालखी सोहळ्यातील सेवेसाठी आणली. या बैलजोडीची आळंदीत भव्य मिरवणूक उत्साहात वाजत गाजत, हरिनाम जयघोषात झाली. यावेळी भाविक, नागरिकांनी मोठी गर्दी केली. श्री भैरवनाथ महाराज मंदिराचे पुजारी भाऊ वाघमारे यांनी बैलजोडीची पूजा केली. मिरवणुकीची सांगता माऊली मंदिर समोर उत्साहात झाली