शहरातील काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा कल अजित पवार यांच्यासोबत
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - शिवसेनेनंतर रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस (ता.२) दुभंगली. समर्थकांसह महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजितदादांच्या आवडत्या पिंपरी-चिंचवड शहरामधील पक्षाच्या बहूतांश पदाधिकाऱ्यांचा कल हा दादांकडेच आहे. माजी विरोधी पक्षनेते नाना काटेंसारख्यांनी तसे जाहीरही केले आहे.
दरम्यान, उद्योगनगरीच नाही, सुनील शेळके आणि दिलीप मोहिते-पाटील हे आमदार दादांबरोबर गेलेल्या मावळ आणि खेड तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अवस्था काहीशी इकडे आड अन् तिकडे विहीर अशी झालेली आहे. ते साहेब (शरद पवार) आणि दादा दोघांनाही मानतात. साहेब त्यांचे आदर्श असून दादांनी त्यांना पक्षात, सत्तेत पदे देत घडवले आहे. त्यामुळे एकनिष्ठता दाखविताना त्यांचे सॅंडविच होत आहे.
त्यातून काहींनी तूर्तास वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. अध्यक्ष अजित गव्हाणे त्यात आहेत. पक्ष पुन्हा एक होईल, अशी आशा त्यांना वाटते आहे. तसाच काहीसा सावध पवित्रा मावळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनीही घेतला आहे. मात्र, या दोघांचाही कल दादांकडे दिसून आला आहे. त्यातूनच खांडगे उद्या मुंबईला दादांना शुभेच्छा देण्यासाठी जाणार आहेत. शपथविधीनंतर दादांनी त्यांची व राष्ट्रवादीची भूमिका एकच असल्याने स्पष्ट केल्याने भेगडे, गव्हाणेंसारख्या इतर पदाधिकाऱ्यांनीही तूर्तास सबुरी बाळगत संयमी भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.