शरद पवार हे शाहू महाराज तर बाबा आढाव हे म. ज्योतीबा फुले – प्रा. नरके

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शरद पवार हे शाहू महाराज तर बाबा आढाव हे म. ज्योतीबा फुले – प्रा. नरके

सासवड, (पुणे) (प्रबोधन न्यूज) - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तुलना थेट राजर्षी शाहू महाराज यांच्याशी तर बाबा आढाव यांची महात्मा ज्योतिबा फुले यांंच्याशी  करण्यात आल्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सासवडमध्ये सत्यशोधक समाज परिषदेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी शरद पवार आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्याविषयी मोठं विधान केले आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. हरी नरके यांनी शरद पवारांची तुलना थेट राजर्षी शाहू महाराज यांच्याशी केली आहे.

सयाजीराव गायकवाड हे जसे दरबारामध्ये महात्मा फुलेंना बोलवाताहेत. सगळ्या मान्यवरांना बसवताहेत आणि फुले हे शेतकऱ्यांचे आसूड वाचताहेत. मला हे प्रारुप पुन्हा शरद पवार हे मुख्यमंत्री असताना पाहायला मिळाले आणि शरद पवार ज्यापद्धतीने बाबा आढावांना बोलवायचे, आणि बाबा ज्या अधिकारवाणीने त्यांना सांगायचे हे पाहून मला असं वाटतं की, शरद पवार हे आजच्या काळातील शाहू महाराज आहेत तर बाबा आढाव हे आजच्या काळातील महात्मा फुले आहेत असं हरी नरके म्हणाले. नरके यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरणात खळबळ निर्माण केले आहे.