उद्या लोकसभेचा निकाल, मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

उद्या लोकसभेचा निकाल, मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

         पिंपरी , (प्रबोधन न्यूज )   -    सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात घेण्यात आली असून या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील ४८ मतदार संघात उद्या मंगळवारी (दि. ४) सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. राज्यात उद्या गैर प्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राज्यातील ४८ मतदार संघातील मतमोजणी केंद्रावर एकूण १४ हजार ५०७ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण २८९ हॉल मध्ये ४३०९ मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सर्व मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व चार लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी तयारी पूर्ण झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुहास दिवसे यांनी संगितले. बारामती आणि पुणे लोकसभा मतदार संघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये, शिरुर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रांजणगाव, ता. शिरुर येथील महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळाच्या गोदामामध्ये तर मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणी शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये होणार आहे.

सकाळी ईव्हीएम यंत्रे आणि टपाली मतपेट्या ठेवलेल्या सुरक्षा कक्षांचे (स्ट्राँग रुम) सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी आदी तसेच उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत काढल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया करुन मतमोजणीला प्रारंभ केला जाईल. सकाळी ८ वाजता टपाली मतदान आणि ईटीपीबीएस मतांची मोजणी सुरू होईल.

प्रत्येक लोकसभा मतदार संघात विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहेत. मावळ लोकसभेची मतमोजणी प्रक्रिया ११६, पुणे लोकसभा ११२, बारामती-१२४ व शिरुर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया ११२ टेबलद्वारे होणार आहे. मावळ मधील पनवेल आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी २४ टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी २३ फेऱ्या होणार आहेत. कर्जत आणि उरण विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी १४ टेबल आणि २४ फेऱ्या तर मावळ आणि पिंपरी विधानसभा मतदार संघासाठी १६ टेबल लावण्यात येणार मावळसाठी २४ तर पिंपरीसाठी २५ फेऱ्या होणार आहेत. तसेच पोस्टल व ईटीपीबीएस मतमोजणीसाठी ८ टेबल लावण्यात येणार आहेत.

पुणे लोकसभाअंतर्गत वडगाव शेरी २२, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोंमेंट, कसबा पेठ प्रत्येकी १४, कोथरुड २० तर पर्वती विधानसभा मतदार संघ क्षेत्रासाठी १८ टेबलवर मतमोजणी होणार असून पोस्टल व ईटीपीबीएस मतमोजणीसाठी १० टेबलची व्यवस्था असेल. वडगाव शेरी २१, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, कसबा पेठ व पुणे कॅन्टोंमेंटसाठी प्रत्येकी २० फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल.

बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड मतदारसंघासाठी १४ टेबल व २३ फेऱ्या, इंदापूर १६ टेबल व २१ फेऱ्या, बारामती १८ टेबल व २२ फेऱ्या, पुरंदर २० टेबल व २२ फेऱ्या, भोर २४ टेबल व २४ फेऱ्या तर खडकवासला विधानसभा मतदार संघासाठी २२ टेबल व २४ फेऱ्या होतील.

शिरुर लोकसभा मतदार संघातील जुन्नर मतदारसंघासाठी १४ टेबल व २५ फेऱ्या, आंबेगाव १४ टेबल व २४ फेऱ्या, खेड-आळंदी १६ टेबल व २४ फेऱ्या, शिरुर १६ टेबल व २७ फेऱ्या, भोसरी २० टेबल व २३ फेऱ्या तर हडपसर विधानसभा मतदार संघासाठी २० टेबल व २६ फेऱ्या होतील. पोस्टल व ईटीपीबीएस मतमोजणीसाठी १२ टेबल लावण्यात येणार आहेत.