प्रीपेड टास्कद्वारे पैसे कमावण्याचा मोह पडला 88 लाखांना
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी. (प्रबोधन न्यूज ) - प्रीपेड टास्कद्वारे पैसे कमावण्याचा मोह एका महिलेला चांगलाच महागात पडला आहे. व्हिडीओ लाईक आणि शेअर केल्यास पैसे मिळतील असे आमिष दाखवून प्रीपेड टास्क पूर्ण करताना काहीतरी चूक झाल्याचे सांगत महिलेकडून 87 लाख 84 हजार 733 रुपये घेत फसवणूक केली. हा प्रकार 24 एप्रिल ते 20 मे या कालावधीत वाकड येथे घडली.
याप्रकरणी 41 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 62895425786900 क्रमांक धारक युनायटेड ह्युमन रिसर्च विभागाचा एच आर बेला (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेसोबत संपर्क करून त्यांना व्हिडीओ लाईक आणि शेअर केल्यास पैसे मिळतील असे सांगितले. आरोपीने फिर्यादीला सुरुवातीला अल्प परतावा दिला. त्यानंतर विश्वास संपादन करून टेलिग्रामवर संपर्क करत प्रीपेड टास्क देत टास्कची पूर्तता करताना काहीतरी चूक झाली आहे ती दुरुस्त करण्यासाठी विविध कारणे सांगितली. क्रेडीट स्कोर अपडेट करण्यासाठी, व्हीआयपी कस्टमर अपग्रेडेशन, खाते एक्टिव्ह करण्यासाठी पैसे भरावे लागतील, अशी कारणे आरोपीने सांगितली. जर पैसे भरले नाहीतर तर अगोदरचे पैसे बुडतील अशी भीती दाखवून तब्बल 87 लाख 84 हजार 733 रुपये विविध बँक खात्यांवर घेऊन महिलेची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.