खान्देशवासियांचा वार्षिक स्नेहमेळावा संपन्न
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी - खान्देश मराठा मंडळ निगडी पुणे येथे गुरुवार दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी सायं ५.०० वा. ३६ वा वार्षिक स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला. मंडळाचे अध्यक्ष श्री. मधुकर सोनू पगार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खान्देशातील लोकप्रिय आणि सामाजिक, शैक्षणिक, उद्योग आदी क्षेत्रात समाजाभिमुक कार्य करणाऱ्याना सन्मानित करण्यात आहे. खान्देश भूषण पुरस्कार डॉ. प्राचार्य. दिलीप शिंदे आणि श्री. फकीरा दगा पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
खान्देश उद्योजक पुरस्कार श्री. प्रकाश भीमराव बाविस्कर आणि श्री. दीपक काशिनाथ पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
गौरव पुरस्कार मध्ये विशेष कार्य/निवड झाल्याबद्दल श्री. रवींद्र शाळीग्राम पाटील (महिला आणि बालविकास महाराष्ट्र राज्याचे सह आयुक्त), श्री. अभिजीत राजेंद्र पाटील (IAS), श्री. देवराज मनिष पाटील(IPS), श्री. करण धर्मेंद्र पाटील, श्री. भिला सोनू पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
हिंदी साहित्य लेखक, गझलकार प्रा. श्री. संजय पवार आणि सौ. नेहा पवार यांना सन्मानित करण्यात आले. आणि इयत्ता १० वी. आणि इयत्ता १२ वी. च्या गुणवंत विध्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमासाठी श्री. युवराज साळुंखे.(मा. कृषी संचालक, महाराष्ट्र राज्य), श्री. हंबीरराव चव्हाण (सुप्रसिद्ध उद्योजक),श्री. अरविंद सूर्यवंशी (मा. अधीक्षक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य) मा. श्री.डॉ. तुषार शेवाळे , यांना विशेष निमंत्रित होते.
कार्यकारणी कमिटीतील, उपाध्यक्ष - श्री.एस.आर,पाटील, सचिव - श्री. प्रदीप दामोदर शिंदे, खजिनदार - श्री. भास्कर दगडू पाटील, सहसचिव - श्री अनिल फकिरा सावंत, हिशोबनीस - श्री. जयवंत विनायक सिसोदे, श्री. कृष्णराव चैत्राम अहिरराव, श्री. मिलिंद भास्कर पाटील पाटील, श्री. संजय भागवत पाटील, श्री. सुरेश भगवान पाटील,
आणि मार्गदर्शक कमिटीतील श्री. बी. के. पाटील, श्री. संतोष दामोदर पाटील, श्री. बी. डी. पाटील, श्री. माधव बाबुराव पवार, श्री.गंगाराम सखाराम पाटील.
आदी मान्यवरांसह कार्यक्रमासाठी स्थानिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते. मंडळांच्या भावी कार्यासाठी आणि नव्या प्रस्तावित इमारतीच्या निर्माणासाठी पाठींबा आणि शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात खान्देश मराठा मंडळाच्या अध्यक्ष्यांनी मंडळाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील होतकरू कार्यकत्यांना मंडळासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. प्रदीप दामोदर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. अनिल फकीरा सावंत यांनी केले. मागील काही महिन्यात मयत झालेल्या सदस्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर श्री बी. के, पाटील यांनी आभार प्रदर्शन करून सर्वांना जेवणाचा आस्वाद घेण्यास विनंती केली. आलेल्या सभासदांनी ऑर्केस्ट्रातील मजेशीर गीतांचा व जेवणाचा आस्वाद घेतला.